कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या बोर्ड मेंबरने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीतील अपल्या कमाईची घोषणा करत डिव्हिडेंड देण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. कंपनीने 6 रुपये प्रति शेअर (600% डिव्हिडेंड)च्या अंतरिम लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे. शुक्रवारच्या सौद्यात बीएसईवर हा शेअर 873.80 रुपयांवर बंद झाला.
काय म्हणाली कंपनी? -
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, “बोर्डाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 6 रुपये प्रति इक्विटी शेअर अर्थात 600% अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. हा लाभांश 27 फेब्रुवारी 2023 रोजी अथवा यानंतर दिला जाईल.' यासाठी बोर्डाची रेकॉर्ड तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
कंपनीचे तिमाहितील निकाल -
समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 38% ने वाढून ₹527 कोटी झाला आहे. तसेच, ऑपरेशन्समधून त्याचे उत्पन्न जवळपास 64% ने वाढून ₹8,310 कोटी झाले आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअर्सचा मॅक्सिमम रिटर्न 9,718.90% एवढा आहे. 11 वर्षात हा शेअर 8 रुपयांवरून 872.90 रुपयांवर पोहोचला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)