Lokmat Money >शेअर बाजार > महाराष्ट्र सरकारकडून बसेस तयार करण्याचं मोठं कंत्राट, 'हा' शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, पाहा

महाराष्ट्र सरकारकडून बसेस तयार करण्याचं मोठं कंत्राट, 'हा' शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, पाहा

Ashok Leyland Share: देशांतर्गत वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँड लिमिटेडचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये आज तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 02:39 PM2024-07-15T14:39:44+5:302024-07-15T14:40:59+5:30

Ashok Leyland Share: देशांतर्गत वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँड लिमिटेडचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये आज तेजी दिसून आली.

Big contract to manufacture buses from Maharashtra government msrtc investors rush to buy ashok layland shares see details | महाराष्ट्र सरकारकडून बसेस तयार करण्याचं मोठं कंत्राट, 'हा' शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, पाहा

महाराष्ट्र सरकारकडून बसेस तयार करण्याचं मोठं कंत्राट, 'हा' शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, पाहा

Ashok Leyland Share: देशांतर्गत वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँड लिमिटेडचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये आज २ टक्क्यांची वाढ झाली. बीएसईवर अशोक लेलँडचा शेअर २२८.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. व्यावसायिक वाहन उत्पादक अशोक लेलँड लिमिटेडला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून २,१०४ बसेसची ऑर्डर मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एमएसआरटीसी) व्हायकिंग पॅसेंजर बसच्या २,१०४ युनिटची ऑर्डर मिळाल्याची माहिती अशोक लेलँडने एक्स्चेंजला दिली. याची किंमत ९८२ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

हिंदुजा समूहाच्या या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ऑर्डर जिंकल्यामुळे बस सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व मजबूत करण्यास मदत होईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एमएसआरटीसी) मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. अशोक लेलँडच्या विशेष 'बस बॉडी' प्रकल्पात या 'व्हायकिंग' प्रवासी बसची निर्मिती केली जाणार आहे. अशोक लेलँडचे एमडी आणि सीईओ शेनू अग्रवाल यांनी नवीन करार एमएसआरटीसीसह कंपनीच्या दीर्घकालीन भागीदारीचा एक भाग असल्याचं म्हटलं.

अशोक लेलँडच्या विशेष बस बॉडी प्लांटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह या बसेस तयार केल्या जातील. ऑगस्ट २०२४ ते ऑगस्ट २०२५ या १२ महिन्यांच्या कालावधीत या ऑर्डर एक्झिक्युट केल्या जाणार असल्याचंही अग्रवाल म्हणाले.

शेअरची स्थिती काय?

ऑर्डर जिंकल्यानंतर अशोक लेलँडच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. इंट्राडेमध्ये हा शेअर २ टक्क्यांनी वधारून २२८.५० रुपयांवर व्यवहार करत होता. २०२४ मध्ये आतापर्यंत शेअरच्या किंमतीत २२ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर १२ महिन्यांच्या कालावधीत शेअरमध्ये ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर ३० टक्क्यांनी वधारलाय. ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत २४५.६० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १५७.६५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ६६,६५६.९० कोटी रुपये आहे. हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी अशोक लेलँडचा निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) जवळपास १७ टक्क्यांनी वाढून ९३३.६९ कोटी रुपये झाला आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Big contract to manufacture buses from Maharashtra government msrtc investors rush to buy ashok layland shares see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.