Join us  

मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 4:43 PM

देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या Reliance Industries चे शेअर सोमवारी 3.09 टक्क्यांनी घसरले.

Reliance Industries : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये आज(दि.30) मोठी घसरण पाहायला मिळाली. देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे शेअर बाजाराचा कलही बदलला. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 1272 अंकांनी किंवा 1.49 टक्क्यांनी घसरुन 84,2999 वर आला. तर निफ्टी 368 अंकांनी किंवा 1.42% घसरून 25,810 वर आला. 

रिलायन्सचे शेअर्स घसरलेसोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 3.09 टक्क्यांनी घसरून 2958 रुपयांवर आले. गेल्या पाच दिवसात हा स्टॉक 0.83% ने घसरला आहे, तर एका महिन्यात यात 2.02% ने घसरण पाहाया मिळाली आहे. तर, मागील सहा महिन्यांत या शेअरे फक्त 0.5 टक्के परतावा दिला आहे. सोमवारी RIL मधील मोठ्या घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दबावाखाली आले. याचे कारण म्हणजे, ही कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 19.31 लाख कोटी रुपये आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स का पडले?रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी 3,217.60 रुपये, नीचांकी 2,220.30 रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी एका वर्षात 27.52% परतावा दिला आहे. पण, आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या घसरणीचे मुख्य कारण प्रॉफिट बुकींग असल्याचे सांगितले जात आहे. प्रॉफिट बुकींगमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर दबाव दिसून आला, त्यामुळे हा शेअर 3 टक्क्यांनी घसरला.

हे शेअर्सही घसरलेरिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय सारख्या हेवीवेट स्टॉक्समध्येही 3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. BSE सेन्सेक्सच्या टॉप 30 पैकी 25 मोठ्या दबावाखाली व्यवहार करत होते, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सर्वात जास्त घसरले.

(नोट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीगुंतवणूकशेअर बाजार