Join us  

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण; शेअर बाजार ६७० अंकांनी घसरला, अदानींच्या दोन शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 4:00 PM

आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.

Share Market Closing Bell : आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी 50 निर्देशांक 21,513 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांकात सोमवारी 197.80 अंकांची घसरण होऊन तो आणि 21513 च्या पातळीवर बंद झाला तर बीएसई सेन्सेक्स 670.93 अंकांच्या घसरणीसह 71,355.22 अंकांच्या पातळीवर बंद झाला.सोमवारी, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.09 टक्क्यांनी घसरला, तर बीएसई स्मॉल कॅप 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक एक टक्क्याहून अधिक अंकांनी घसरून बंद झाले. सोमवारी अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, एचसीएल टेक आणि हीरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर यूपीएल, नेस्ले इंडिया, एसबीआय लाईफ आणि एसबीआयचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरण

देवयानी इंटरनॅशनल, टाटा मोटर्स, पटेल इंजिनीअरिंग, एचडीएफसी लाईफ, जिओ फायनान्शिअल, आयसीआयसीआय बँक, ग्लोबल स्पिरिट, एक्साइड इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, स्टोव्ह क्राफ्ट, होम फर्स्ट फायनान्स, ब्रँड कॉन्सेप्ट आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

या शेअर्समध्ये तेजीबजाज फायनान्स, पतंजली फूड्स, आयआरसीटीसी, गार्डन रीच शिप बिल्डर आणि गरवारे टेक्निकल फायबर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स किरकोळ वाढीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार