Lokmat Money >शेअर बाजार > Share Market मध्ये मोठी घसरण, निफ्टी १८८०० च्या खाली; अदानी एन्टरप्रायझेस ४ टक्क्यांनी घसरला

Share Market मध्ये मोठी घसरण, निफ्टी १८८०० च्या खाली; अदानी एन्टरप्रायझेस ४ टक्क्यांनी घसरला

नव्या कामकाजाच्या आठवड्यात पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. वाचा कोणते शेअर्स आपटले, तर कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 06:08 PM2023-06-19T18:08:07+5:302023-06-19T18:08:27+5:30

नव्या कामकाजाच्या आठवड्यात पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. वाचा कोणते शेअर्स आपटले, तर कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ.

Big fall in share market closing more than 200 points Nifty below 18800 Adani Enterprises fell 4 percent know up down shares | Share Market मध्ये मोठी घसरण, निफ्टी १८८०० च्या खाली; अदानी एन्टरप्रायझेस ४ टक्क्यांनी घसरला

Share Market मध्ये मोठी घसरण, निफ्टी १८८०० च्या खाली; अदानी एन्टरप्रायझेस ४ टक्क्यांनी घसरला

नव्या कामकाजाच्या आठवड्यात पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 216.28 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी घसरून 63,168.30 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 70.55 अंकांनी म्हणजेच 0.37 टक्क्यांनी घसरून 18,755.45 अंकांच्या पातळीवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये 3.91 टक्क्यांच्या घसरणीसह 2,411.45 रुपयांवर बंद झाले.

दरम्यान, ऑटो, बँक, रिअल इस्टेट, पॉवर, कॅपिटल गुड्स, रिअल इस्टेट आणि एफएमसीजी निर्देशांकात 0.5-0.5 टक्क्यांची घसरण झाली. त्याच वेळी, पीएसयू बँक निर्देशांकात 0.4 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर आयटी निर्देशांकात 0.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले.

हे शेअर्स घसरले
बीएसई सेन्सेक्सवर कोटक महिंद्रा बँकेचा शेअर सर्वाधिक 1.72 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्याचप्रमाणे, अॅक्सिस बँकेचा शेअर 1.54 टक्के, एनटीपीसीचा शेअर 1.35 टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), ICICI बँकेचा शेअर 1.24 टक्के आणि भारती एअरटेलचा शेअर 1.07 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

या शेअर्समध्ये तेजी
बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, टीसीएस आणि सन फार्मा यांचे शेअर्स सेन्सेक्सवर 1-1 टक्क्यांनी उसळी घेऊन बंद झाले. याशिवाय टायटन, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्सही वाढीसह बंद झाले.

Web Title: Big fall in share market closing more than 200 points Nifty below 18800 Adani Enterprises fell 4 percent know up down shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.