Join us

RBI च्या निर्णयाचा मोठा परिणाम, सलग दुसऱ्या दिवशी शेअर आपटला; २०% ची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 1:27 PM

शेअर्स बुधवारी 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 382.80 रुपयांवर पोहोचले. मंगळवारीही कंपनीच्या शेअर्समध्ये 20% ची मोठी घसरण दिसून आली.

आयआयएफएल फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बुधवारीही बाजारात IIFL फायनान्सचे शेअर्स कोसळले. कंपनीचे शेअर्स बुधवारी 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 382.80 रुपयांवर पोहोचले. मंगळवारीही कंपनीच्या शेअर्समध्ये 20% ची मोठी घसरण दिसून आली. IIFL Finance चे शेअर्स दोन दिवसात 35% पेक्षा जास्त घसरले आहेत. आरबीआयच्या कारवाईनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण दिसून आली आहे. रिझर्व्ह बँकेने IIFL फायनान्सला तात्काळ प्रभावानं गोल्ड लोन मंजूर करणं आणि वितरित करणं थांबवण्यास सांगितलं आहे. 

बँकेच्या या कारवाईनंतर विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने आयआयएफएल फायनान्सचे (IIFL Finance) शेअर्स डाऊनग्रेड केले आहेत. ब्रोकरेज हाऊसनं आयआयएफएल फायनान्स टू होल्ड रेटिंग डाउनग्रेड केलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईज 765 रुपयांवरून 435 रुपयांपर्यंत कमी केली आहे.  

2 दिवसांत 35 टक्क्यांची घसरण 

आयआयएफएल फायनान्सचे शेअर्स 2 दिवसात 35% पेक्षा जास्त घसरले आहेत. 4 मार्च 2024 रोजी आयआयएफएल फायनान्सचे शेअर्स 595 रुपयांवर बंद झाले होते. 6 मार्च 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 382.80 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली. या वर्षी आतापर्यंत, आयआयएफएल फायनान्सच्या शेअर्समध्ये सुमारे 37 टक्क्यांची घसरण झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 602.95 रुपयांवरून 382.80 रुपयांपर्यंत घसरले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 704.20 रुपये आहे.  

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारपैसा