Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात तेजी! आयटी, फार्मा, एनर्जी शेअर्स चमकले; गुंतवणूकदारांनी 8 लाख कोटी कमावले

शेअर बाजारात तेजी! आयटी, फार्मा, एनर्जी शेअर्स चमकले; गुंतवणूकदारांनी 8 लाख कोटी कमावले

बुधवारच्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी शेअर बाजाराने जबरदस्त कमबॅक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:09 PM2024-03-14T17:09:23+5:302024-03-14T17:11:28+5:30

बुधवारच्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी शेअर बाजाराने जबरदस्त कमबॅक केले.

big increase in stock market! IT, Pharma, Energy Shares Shine; 8 lakh crores earned by investors | शेअर बाजारात तेजी! आयटी, फार्मा, एनर्जी शेअर्स चमकले; गुंतवणूकदारांनी 8 लाख कोटी कमावले

शेअर बाजारात तेजी! आयटी, फार्मा, एनर्जी शेअर्स चमकले; गुंतवणूकदारांनी 8 लाख कोटी कमावले

Stock Market Closing Bell: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यासांठी गुरुवारचा दिवस अतिशय चांगला ठरला. आयटी, एफएमसीजी शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली, त्यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुरुवारच्या सत्रात जोरदार वाढ झाली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 335 अंकांच्या उसळीसह 73,097 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा NIFTI 149 अंकांनी वाढून 22,146 अंकांवर बंद झाला.

आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनी जोरदार कमबॅक केले. NIFTIचा मिडकॅप निर्देशांक 930 अंकांच्या किंवा 2.02 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 500 अंकांच्या वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस सेक्टर्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले. फक्त बँकिंग स्टॉक्समध्ये घसरण झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 12 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 35 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅपमध्ये 8 लाख कोटींची वाढ
गुरुवारच्या सत्रात शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे, बुधवारी यात 14 लाख कोटी रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 380.16 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 372.11 लाख कोटी रुपये होते.

Web Title: big increase in stock market! IT, Pharma, Energy Shares Shine; 8 lakh crores earned by investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.