शेअर बाजारातगुंतवणूक करुन चांगला नफा मिळवायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे संयम असणं आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये बंपर नफा मिळविण्यासाठी, योग्य स्टॉक ओळखणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला बंपर नफा नक्की मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीच्या शेअर्सबद्दल सांगणार आहोत ज्यांना टाटा समूहाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे.
तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. हा शेअर तेजस नेटवर्कचा (Tejas Networks Ltd ) आहे. या कंपनीला टाटा समूहाकडून नुकतीच मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं तेजस नेटवर्क लिमिटेडला ७५० कोटी रुपये अॅडव्हान्सही दिल्याची माहिती समोर आलीये. यानंतर तेजस नेटवर्क्स लिमिटेड शेअरने ८ सप्टेंबर रोजी आपल्या उच्चांकी स्तर गाठला होता. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ९३४.९० रुपये आणि नीचांकी स्तर ५१० रुपये आहे.
... म्हणून टाटानं दिली ऑर्डर
तेजर नेटवर्क डेटा नेटवर्किंग प्रोडक्ट्स आणि नेटवर्क ऑप्टिकल्सच्या प्रोडक्ट्सचं उत्पादन करते. ७५ पेक्षा अधिक देशांमध्ये ही टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस प्रदान करते. ही कंपनी एक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरही आहे. टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसला भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) देशभरात ४जी आणि ५जी साठी १५ हजार कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. आता तेजस नेटवर्कला याच्याशीच निगडित कामाची नवी ऑर्डर देण्यात आली. यात ४जी आणि ५जी नेटवर्कसाठी आवश्यक रेडिओ अॅक्सेस नेटवर्क इक्विपमेंट आणि अन्य सामानांच्या पुरवठ्याचा समावेश आहे.
शेअर वधारला
गेल्या महिन्याभरात या शेअरमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झालीये. गेल्या सहा महिन्यांमध्ये यात ५१ टक्क्यांची वाढ झालीये. दरम्यान आता शेअर वर्षभराच्या उच्चांकी स्तरावार पोहोचलाय. गेल्या पाच वर्षांमध्ये कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना १९५.१५ टक्क्यांचे रिटर्न दिलंय. यावर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरमध्ये जवळपास ४७.४३ टक्क्यांची वाढ झालीये.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)