Join us  

Paytm वर आली मोठी अपडेट, सर्किट लिमिटमध्ये बदल; शेअरवरही दिसला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 2:39 PM

Paytm Share Price : पेटीएमबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनंतर पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशनलिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

Paytm Share Price : पेटीएमबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनंतर पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशनलिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात पेटीएमचा शेअर १० टक्क्यांनी वधारून ३८१.२० रुपयांवर पोहोचला. पेटीएमचा शेअर गुरुवारी ३४६.५५ रुपयांवर बंद झाला. पेटीएमच्या सर्किट लिमिटमध्ये शुक्रवारपासून बदल करण्यात आला आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९९८.३० रुपये आहे. पेटीएम शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३१० रुपये आहे. 

सर्किट लिमिट वाढवलं 

पेटीएमचं सर्किट लिमिट १० टक्के करण्यात आली आहे. यापूर्वी ही सर्किट मर्यादा ५ टक्के होती. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनं (एनएसई) यासंदर्भात माहिती देताना ७ जून २०२४ पासून सध्याच्या पातळीवरून प्राईज बँड रिवाईज केल्याचं म्हटलंय. यापूर्वी शेअर बाजारांनी पेटीएमच्या शेअर्सचं सर्किट लिमिट कमी केलं होतं. पेटीएमव्यतिरिक्त भारत डायनॅमिक्स लिमिटेड, एथर इंडस्ट्रीज, हिंदुस्थान झिंक, कोचीन शिपयार्डच्या प्राइस बँडमध्येही बदल करण्यात आला आहे. 

२१५० वर आलेला आयपीओ 

कंपनीचा आयपीओ २१५० रुपयांवर आला होता, वर्षभरात कंपनीचे शेअर्स ४७ टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचा आयपीओ ८ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला झाला आणि तो १० नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. पेटीएमचा आयपीओ एकूण १.८९ पट सब्सक्राइब झाला. पेटीएमच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ४७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन लिमिटेडचा शेअर ७ जून २०२३ रोजी ७२७ रुपयांवर होता. पेटीएमचा शेअर ७ जून २०२४ रोजी ३८१.२० रुपयांवर पोहोचला आहे.  

गेल्या ६ महिन्यांत पेटीएमच्या शेअर्समध्ये जवळपास ४३ टक्क्यांची घसरण झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ६६१.३५ रुपयांवरून ३८१ रुपयांवर आले आहेत. तर, या वर्षी आतापर्यंत पेटीएमच्या शेअर्समध्ये ४१ टक्क्यांची घसरण झालीये. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजार