Lokmat Money >शेअर बाजार > "इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, १९२९ सारख्या परिस्थितीची भीती," शेअर बाजाराबाबत कोणी केली ही भविष्यवाणी

"इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, १९२९ सारख्या परिस्थितीची भीती," शेअर बाजाराबाबत कोणी केली ही भविष्यवाणी

Stock Market Crash: जागतिक बाजारात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारही सर्वात वाईट अवस्थेतून जात आहे. जगात व्यापारयुद्ध सुरू झालंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:39 IST2025-03-13T14:38:25+5:302025-03-13T14:39:40+5:30

Stock Market Crash: जागतिक बाजारात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारही सर्वात वाईट अवस्थेतून जात आहे. जगात व्यापारयुद्ध सुरू झालंय.

biggest decline in history will happen fear of a 1929 like situation Robert Kiyosaki predicted about the stock market | "इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, १९२९ सारख्या परिस्थितीची भीती," शेअर बाजाराबाबत कोणी केली ही भविष्यवाणी

"इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, १९२९ सारख्या परिस्थितीची भीती," शेअर बाजाराबाबत कोणी केली ही भविष्यवाणी

Stock Market Crash: जागतिक बाजारात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारही सर्वात वाईट अवस्थेतून जात आहे. जगात व्यापारयुद्ध सुरू झालंय. यामुळे देश-विदेशातील बाजारपेठांना मोठा फटका बसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी आणखी एक भयावह भविष्यवाणी केली आहे. रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी, शेअर बाजाराचा फुगा फुटत आहे आणि आपण इतिहासातील सर्वात मोठ्या मंदीच्या छायेत येऊ शकतो, असं म्हटलंय.

१९२९ चाही रेकॉर्ड तुटणार

कियोसाकी यांनी इतिहासातील सर्वात मोठी घसरण होण्याचा इशारा दिला असून यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. "जागतिक बाजारात प्रचंड उलथापालथ सुरू आहे आणि ही इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक घसरण असू शकते अशी चिंता आहे. अमेरिका, जर्मनी आणि जपानमधील आर्थिक संकटानं ही मंदी ज्यामुळे महामंदी आलेली अशा १९२९ च्या शेअर बाजारातील घसरणीपेक्षाही अधिक असू शकते अशी भीती आहे," असं रॉबर्ट कियोसाकी यांनी मंगळवारी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं.

गुंतवणूकदारांनी धीर धरावा

या घरणीबाबत, आपलं पुस्तक रिच डॅड्स प्रोफेसमधून यापूर्वीच इशारा दिला होता, असं कियोसकी यांनी नमूद केलं. "फुगा फुटत आहे. ही इतिहासातील सर्वात मोठी घसरण असू शकते याची भीती वाट आहे. घाबरणं ही सामान्य बाब आहे. परंतु घाबरू नका आणि धीर धरा. २००८ मध्ये जेव्हा घसरण झाली होती, तेव्हा मी सर्वकाही थांबण्याची वाट पाहिली आणि नंतर मोठ्या प्रमाणात रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली," असं ते म्हणाले.

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, जग ज्या मंदीच्या छायेतून जात आहे... ती तुमच्यासाठी जीवनातील मोठी संधीदेखील असू शकते. तुम्ही फक्त धीर धरा आणि शांत राहा," असंही म्हटलं. कियोसाकी यांनी स्ट्रॅटजी गुंतवणूकीवर भर दिला आणि रियल इस्टेट, सोनं, चांदी आणि बिटकॉईन सारख्या प्रमुख संपत्तींमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: biggest decline in history will happen fear of a 1929 like situation Robert Kiyosaki predicted about the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.