Join us

Zomato Share Price: एका निर्णयाने कंपनीचं नशीब पालटलं! Zomato चा शेअर बनला रॉकेट; आयफोनशी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 3:41 PM

Zomato-Blinkit Update: ब्लिंकिटच्या ऑफरमुळे झोमॅटोचा स्टॉक ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. झोमॅटोच्या स्टॉकवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत.

Zomato Stock Price: शेअर बाजारात झोमॅटो कंपनीचा शेअरने दरदार पुनरागमन केलंय. इतकचं नव्हे तर तो ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. याला कारण ठरलंय झोमॅटो कंपनीची नवीन सेवा. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिटने (Blinkit) १० मिनिटांत iPhone 16 ची डिलिव्हरी सुरू केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये या सेवेला सुरुवात करण्यात आली. एकीकडे आयफोनसाठी लोक लांबचलांब रांगेत उभे आहेत. तर दुसरीकडे अवघ्या १० मिनिटांत फोन होम डिलिव्हर होतोय. या सेवेचा सकारात्म परिणाम शेअर मार्केटमध्येही पाहायला मिळाला. झोमॅटोच्या शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे शेअरने 4.25 टक्क्यांनी झेप घेतली. झोमॅटोचा शेअर 290.70 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला.

ब्लिंकिटकडून १० मिनिटांत iPhone 16 घरपोचApple ने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात iPhone 16 चे नवीन अपडेट लॉन्च केले होते. भारतात आजपासून प्रमुख शहरांमध्ये आयफोन 16 ची विक्री सुरू करण्यात आली आहे. लोकांमध्ये नवीन आयफोन घेण्याचं वेड पाहायला मिळत आहे. ग्राहक सकाळपासून Apple स्टोअरबाहेर लांब रांगेत उभे आहेत. दुसरीकडे ब्लिंकिटने या संधीचा फायदा उचलत ऑनलाईन बुकिंबच्या १० मिनिटांच्या आत आयफोन घरी डिलिव्हरी देत आहे. ब्लिंकिटने १० मिनिटांत आयफोन वितरीत करण्यासाठी युनिकॉर्न स्टोअर्स व्यतिरिक्त Apple रिटेलर्सशी देखील करार केला आहे. जेणेकरून आयफोन 16 त्याच्या वापरकर्त्यांना सहज उपलब्ध करून देता येईल.

Blinkint वापरकर्त्यांना पहिल्याच दिवशी मिळाला iPhone 16'नवीन आयफोन 16 ची डिलिव्हरी फक्त १० मिनिटांत मिळवा', अशी पोस्ट ब्लिकिंटचे सह-संस्थापक आणि सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिली आहे. याच पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, की दिल्ली NCR, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि लखनऊच्या काही भागात लॉन्चच्या दिवशीच ब्लिंकिट युजर्सना आम्ही नवीन आयफोन १६ घरपोच देणार आहोत. यासाठी  आम्ही सलग तिसऱ्या वर्षी Unicorn Stores सोबत करार केला आहे. Unicorn Stores ठराविक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय पर्यांवर डिस्काउटंही देत आहे. आज काही मिनिटांत ब्लिंकिटने ३०० आयफोन १६ डिलिव्हर केले आहेत.

झोमॅटोचा स्टॉक रॉकेटया बातमीचा परिणाम शेअर बाजारातही पाहायला मिळाला. आज झोमॅटोचा शेअर 279 रुपयांवर उघडला आणि थेट 290.70 रुपयांच्या ऑलटाईम हायवर पोहचला. सध्या शेअर 3.25 टक्क्यांच्या वाढीसह 287.90 रुपयांवर व्यवहार करत आहे. ब्लिंकिट झोमॅटोसाठी ब्लॅक डायमंड ठरला आहे. जेव्हा झोमॅटोने ब्लिंकिट विकत घेतले होते, तेव्हा त्यावर टीका होत होती. परंतु, आता ब्लिंकिटच्या विस्तारामुळे सर्व ब्रोकरेज हाऊसेस झोमॅटोच्या स्टॉकवर तेजीवर लक्ष ठेवत आहेत.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक