शेअर बाजारातील स्मॉलकॅप कंपनी ब्लिस जीव्हीएस फार्माच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर गुरुवारी 20 टक्क्यांनी वधारून 100.90 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर बुधवारी 84.09 रुपयांवर बंद झाला होता. खरे तर, सप्टेंबर तिमाहीतील जबरदस्त रिझल्ट आणि कामकाजाशी संबंधित एका मोठ्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी आली आहे. कंपनीच्या शअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 103.90 रुपये एवढा आहे. तर निचांक 68.60 रुपये एवढा आहे.
क्षमता वाढविण्याची घोषणा -
ब्लिस जीव्हीएस फार्माने आपल्या पालघर वेव्हूर युनिटमध्ये 30 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कॅपॅसिटी वाढविण्याची घोषणा केली आहे. नव्या कॅपेसिटीनंतर, सेमी-सॉलिड डोसेसमध्ये या प्लांटची एकूण कॅपेसिटी 200 मिलियन युनिट्स होण्याची शक्यता आहे. कॅपॅसिटी अॅडिशनचे काम आर्थिकवर्ष 2025-26 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कंपनी हा विस्तार कर्ज आणि अंतर्गत स्रोतांच्या माध्यमातून पूर्ण करेल.
कंपनीला 33 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा -
ब्लिस जीव्हीएस फार्माला चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत तब्बल 33.89 कोटी रुपयांचा स्टँडअलोन नेट प्रॉफिट झाला आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 25.44 कोटी रुपयांचा नपा झाला होता. तर जून 2023 तिमाहीत कंपनीला 7.49 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जुलै-सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत या स्मॉलकॅप कंपनीचे एकूण उत्पन्न 181.92 कोटी रुपये होत. जे एक वर्ष आधीच्या याच कालावधीत 153.07 कोटी रुपये होते.
या वर्षी आतापर्यंत फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये 37 टक्क्यांची तेजी आली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी कंपनीचा शेअर 72.60 रुपयांवर होता. जो आता 100.90 रुपयांवर पोहोचला आहे.