Lokmat Money >शेअर बाजार > तब्बल 2362% परतावा...'या' शेअरने फक्त एका वर्षात ₹ 1 लाखाचे केले ₹ 24 लाख

तब्बल 2362% परतावा...'या' शेअरने फक्त एका वर्षात ₹ 1 लाखाचे केले ₹ 24 लाख

या शेअरे अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 08:00 PM2024-08-27T20:00:31+5:302024-08-27T20:00:45+5:30

या शेअरे अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Bonadada Engineering Multibagger Stock: 2362% Return...Share Made ₹ 1 Lakh to ₹ 24 Lakh in Just One Year | तब्बल 2362% परतावा...'या' शेअरने फक्त एका वर्षात ₹ 1 लाखाचे केले ₹ 24 लाख

तब्बल 2362% परतावा...'या' शेअरने फक्त एका वर्षात ₹ 1 लाखाचे केले ₹ 24 लाख

Bonadada Engineering Multibagger Stock : शेअर मार्केटची गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे, परंतु काहीवेळा असे शेअर्स हाती लागतात, जे अल्पावधीत मालामाल करतात. अशाच मल्टीबॅगर शेअर्समध्ये बंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड (Bonadada Engineering) या सोलार कंपनीच्या शेअरचा समावेश आहे. हा शेअर एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. कंपनीच्या शेअर्सने फक्त एका वर्षात 1 लाख रुपयांचे 24 लाख रुपये केले. 

1 वर्षात 2362% परतावा
सोलर कंपनी Bonadada Engineering सोलर प्लांट डिझाईन, सर्व्हे, सप्लाय, इंस्टॉलेशन, टेस्टिंग आणि सोलर प्लांट सेग्रिड कनेक्टड डिस्ट्रीब्यूशन सिस्टमचे काम करते. अल्पावधीतच गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर्स ठरलेल्या शेअर्सच्या यादीत या स्टॉकचाही समावेश आहे. एका वर्षापूर्वी, म्हणजेच 30 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीचा शेअर अवघ्या 149.62 रुपयांवर होता, जो मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी 3684.45 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, या शेअरने गुंतवणूकदारांना 2362 टक्के परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याची आजची किंमत 24,62,000 रुपये झाली असेल.

सलग दोन दिवस अप्पर सर्किट 
बोंडाडा कंपनीचे शेअर्स सलग दोन दिवस अपर सर्किटला लागत आहेत. मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच हा शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला पोहोचला आणि 3684.45 रुपयांचा सर्वकालिन उच्चांक गाठला. पाच दिवसांत या शेअरची किंमत सुमारे 12 टक्क्यांनी वाढली आहे.शेअर्सच्या सततच्या वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवलही वाढून 7960 कोटी रुपये झाले आहे. 

सहा महिन्यांत पैसा चौपट झाला
केवळ एका वर्षातच नव्हे, तर बोंडाडा शेअरने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांची रक्कम चौपट केली आहे. सहा महिन्यांपूर्वी एका शेअरची किंमत 890 रुपये होती, म्हणजेच गुंतवणूकदारांना 313.98 टक्के परतावा मिळाला आहे. तर, गेल्या एका महिन्यात या शेअरची किंमत जवळपास 22 टक्क्यांनी वाढली आहे. 

500 कोटींची ऑर्डर मिळाली
बोंडाडा इंजिनीअरिंग कंपनीला नुकतीच महाराष्ट्रात मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर लुमिना क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, प्युअर लाइट प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हीव्हीकेआर एनर्जीकडून मिळाली आहे. या ऑर्डरची किंमत 576 कोटी रुपये आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Bonadada Engineering Multibagger Stock: 2362% Return...Share Made ₹ 1 Lakh to ₹ 24 Lakh in Just One Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.