Lokmat Money >शेअर बाजार > ₹७५ वर आलेला IPO, आता शेअर पोहोचला ₹११०० पार; गुंतवणूकदार मालामाल

₹७५ वर आलेला IPO, आता शेअर पोहोचला ₹११०० पार; गुंतवणूकदार मालामाल

या छोट्या कंपनीच्या शेअर्सची सध्या शेअर बाजारात चर्चा आहे. कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. काही महिन्यांमध्ये हा शेअर ७५ रुपयांवरून ११०० रुपयांपार पोहोचलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:42 AM2024-04-10T11:42:05+5:302024-04-10T11:47:03+5:30

या छोट्या कंपनीच्या शेअर्सची सध्या शेअर बाजारात चर्चा आहे. कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. काही महिन्यांमध्ये हा शेअर ७५ रुपयांवरून ११०० रुपयांपार पोहोचलाय.

Bondada Engineering IPO at rs 75 share now crosses rs 1100 Investor huge profit share market investment | ₹७५ वर आलेला IPO, आता शेअर पोहोचला ₹११०० पार; गुंतवणूकदार मालामाल

₹७५ वर आलेला IPO, आता शेअर पोहोचला ₹११०० पार; गुंतवणूकदार मालामाल

बोंदडा इंजिनिअरिंग (Bondada Engineering) या छोट्या कंपनीच्या शेअर्सची सध्या शेअर बाजारात चर्चा आहे. कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. बोंदडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सनं 1100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीचा IPO गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 75 रुपये किमतीत आला होता. आयपीओच्या किमतीच्या तुलनेत बोंदडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 1350% पेक्षा अधिक वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1108 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 142.50 रुपये आहे.
 

बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ 18 ऑगस्ट 2023 रोजी उघडण्यात आला आणि तो 22 ऑगस्टपर्यंत खुला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 75 रुपये होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी बोंदडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 142.50 रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
 

112 टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्राईब
 

बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ एकूण 112.28 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 100.05 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, आयपीओच्या इतर कॅटेगरीमध्ये 115.46 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओची साईज 42.72 कोटी रुपये होती. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजाराच्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 86 टक्के होता, जो आता 63.33 टक्क्यांवर आला आहे.
 

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Bondada Engineering IPO at rs 75 share now crosses rs 1100 Investor huge profit share market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.