Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात तेजीच माहोल; Sensex ३०५, तर Nifty १२१ अंकांनी वधारला

शेअर बाजारात तेजीच माहोल; Sensex ३०५, तर Nifty १२१ अंकांनी वधारला

Stock Market Updates Today: शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं वातावरण दिसून येत आहे. सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारीही शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं वातावरण दिसून येतंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:46 AM2024-11-26T09:46:40+5:302024-11-26T09:46:40+5:30

Stock Market Updates Today: शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं वातावरण दिसून येत आहे. सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारीही शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं वातावरण दिसून येतंय.

Booming atmosphere in the stock market Sensex 305 while Nifty gained 121 points share up know details | शेअर बाजारात तेजीच माहोल; Sensex ३०५, तर Nifty १२१ अंकांनी वधारला

शेअर बाजारात तेजीच माहोल; Sensex ३०५, तर Nifty १२१ अंकांनी वधारला

Stock Market Updates Today: शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं वातावरण दिसून येत आहे. मंगळवारी निफ्टी १२१ अंकांनी मजबूत होऊन २४३४३ वर तर सेन्सेक्स ३०५ अंकांनी मजबूत होऊन ८०,४१५ वर बंद झाला. बँक निफ्टी ३४७ अंकांनी वधारून ५२५५५ वर उघडला. बाजारातील भावना आणि ट्रेंडमध्ये बदल होत आहे. दरम्यान, शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीदार दिसून येत आहेत. इन्फोसिस, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी या सारख्या शेअर्समध्ये तेजी आहे. तर अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, सन फार्मा आणि इंडसइंड बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून येतेय.

सोमवारी निफ्टी ३१५ अंकांनी वधारून २४२२२ अंकांवर बंद झाला. एफआयआयनं बऱ्याच काळानंतर खरेदी केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये ९९४७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. दरम्यान, डीआयआयनं ६९०७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे जी नकारात्मक आहे. इकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, कॅनडा, मेक्सिको सारख्या देशांवर शुल्क लावण्याची घोषणा केली आहे, ज्याचा परिणाम आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

निफ्टीचा सपोर्ट २३,९०० वर

एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्च हेड दीपक जसानी यांच्यानुसार ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे अमेरिकेत पेट्रोल आणि ऑटोमोबाईलसह अनेक वस्तूंच्या किंमती वाढतील. त्यामुळे महागाई वाढेल आणि फेडरल रिझर्व्हला व्याजदरात कपात करणं थोडं अवघड जाईल. हेच कारण आहे की अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये ४ महिन्यांतील सर्वात मोठी वाढ झाली आहे. नियर टर्ममध्ये निफ्टीचा रेझिस्टंन्स २४५०० वर राहील, तर सपोर्ट आता २३९०० च्या रेंजमध्ये शिफ्ट झाला आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेचा परिणाम दिसेल

ट्रम्प यांनी जानेवारीत जेव्हा आपण पदभार स्वीकारू तेव्हा चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क लादणार असल्याचं म्हटलं आहे. कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के, तर चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के शुल्क आकारण्यात येईल. या बातमीचा परिणाम आज बाजारावर दिसून येत आहे.

टेलिकॉम कंपन्यांसाठी खुशखबर

टेलिकॉम कंपन्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२२ पूर्वीची बँक गॅरंटी माफ करणं ही अत्यंत सकारात्मक बातमी आहे. याचा फायदा सर्व टेलिकॉम कंपन्यांना होणार आहे. विशेषत: व्होडाफोन आयडियासाठी ते संजीवनीसारखे काम करेल. आज भारती एअरटेल, भारती हेक्साकॉम, इंडस टॉवर सारख्या शेअर्सवर फोकस असेल.

Web Title: Booming atmosphere in the stock market Sensex 305 while Nifty gained 121 points share up know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.