सोलर ग्लास मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बोरोसिल रिन्यूएबल्सचा शेअर बुधवारी 11 टक्क्यांहून अधिक वाढून 632 रुपयांवर पोहोचला. बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स बुधवारी 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारात कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी वाढले होते. बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांमध्ये उत्कृष्ट परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 17 पैशांवरून 600 रुपयांपर्यंत वाढले आहेत.मोदींनी केली मोठी घोषणापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकार १ कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर पॅनेल बसवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यात येईल. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर मंगळवारी सोलर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. बोरोसिल रिन्युएबल्स व्यतिरिक्त, वेबसोल एनर्जी सिस्टम्स, स्टर्लिंग आणि विल्सन रिन्युएबल एनर्जी, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज आणि टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली.17 पैशांवरून 600 वर पोहोचला शेअरगेल्या काही वर्षांत बोरोसिल रिन्युएबल्सच्या (Borosil Renewables) शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. 22 जानेवारी 2004 रोजी कंपनीचे शेअर 17 पैशांवर होते. सोलार पावर इंडस्ट्रीशी संबंधित या कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी 2024 रोजी 632 रुपयांवर पोहोचले. या कालावधीत बोरोसिल रिन्युएबलचे शेअर्स 360000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 10 वर्षांत, मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स 6300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स 31 जानेवारी २०१४ रोजी 9.59 रुपये होते, जे आता 632 रुपयांवर पोहोचले आहेत.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणुक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
१७ पैशांवरून ६०० रुपयांपार गेला 'हा' Multibagger Stock, आता एका घोषणेमुळे शेअरमध्ये तुफान तेजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 2:37 PM