Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराच्या घसरणीवर ब्रेक, Sensex २०० अंकांनी वधारला; IT आणि फार्मा शेअर्स मजबूत

शेअर बाजाराच्या घसरणीवर ब्रेक, Sensex २०० अंकांनी वधारला; IT आणि फार्मा शेअर्स मजबूत

Stock Markets Today: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर मोठी घसरण पाहिल्यावर बुधवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:54 IST2025-01-22T09:54:52+5:302025-01-22T09:54:52+5:30

Stock Markets Today: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर मोठी घसरण पाहिल्यावर बुधवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला.

Break in stock market decline Sensex rises by 200 points IT and pharma shares strengthen | शेअर बाजाराच्या घसरणीवर ब्रेक, Sensex २०० अंकांनी वधारला; IT आणि फार्मा शेअर्स मजबूत

शेअर बाजाराच्या घसरणीवर ब्रेक, Sensex २०० अंकांनी वधारला; IT आणि फार्मा शेअर्स मजबूत

Stock Markets Today: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर मोठी घसरण पाहिल्यावर बुधवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला. आयटी आणि एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी आली आहे. तेजीनं उघडल्यानंतर सेन्सेक्स ३२६ अंकांच्या वाढीसह ७६००० चा टप्पा ओलांडून ७६२०७ अंकांवर व्यवहार करत होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १४१ अंकांच्या वाढीसह २३११२ अंकांवर व्यवहार करत होता.

क्षेत्रीय स्थिती

आजच्या व्यवसायातील तेजी पाहता आयटी, फार्मा, एफएनसीजी, बँकिंग, हेल्थकेअर सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी आहे, तर ऑईल अँड गॅस, कन्झ्युमर ड्युरेबल्स, एनर्जी, मीडिया, रिअल इस्टेट, मेटल्स आणि ऑटो सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे. बाजारातील तेजीनंतर आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक ६४४ अंकांच्या वाढीसह ५३१८० वर व्यवहार करत आहे. निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांकही २६० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. 

शेअर बाजारात शानदार तेजी असूनही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. बीएसईचं बाजार भांडवल ४२१.५९ लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे मागील सत्रात ४२४.०७ लाख कोटी रुपयांवर बंद झालं होतं.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

आजच्या सत्रात सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी २१ शेअर्समध्ये तेजी दिसत असून ९ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३३ शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत तर १७ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. तेजी असलेल्या  शेअर्समध्ये सन फार्मा १.६२ टक्के, इन्फोसिस १.२७ टक्के, टीसीएस ०.९९ टक्के, मारुती ०.८६ टक्के, आयटीसी ०.७९ टक्के, एचयूएल ०.५१ टक्के, मारुती ०.४९ टक्के, रिलायन्स ०.४८ टक्के, नेस्ले ०.४० टक्क्यांनी यांचा समावेश आहे. तर झोमॅटो २.९१ टक्के, पॉवर ग्रिड १.०२ टक्के, टाटा स्टील ०.८१ टक्के, इंडसइंड बँक ०.४४ टक्के, एसबीआय ०.३६ टक्क्यांनी घसरले.

Web Title: Break in stock market decline Sensex rises by 200 points IT and pharma shares strengthen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.