गेल्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत होती. दोन आठवड्यांच्या नीचांकी स्तरावरून 90 टक्के वाढ झाल्यानंतर, पेटीएम शेअर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने पेटीएम शेअर्सवर पुन्हा यू-टर्न घेतला आहे. ब्रोकरेज हाऊसनं पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचं रेटिंग आउटपरफॉर्मवरून न्यूट्रल केलं आहे. ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीनं पेटीएम शेअर्सवर ८०० रुपयांचे टार्गेट प्राईज दिले आहे.
ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीनं या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पेटीएमचं रेटिंग डबल अपग्रेड केलं होतं. याशिवाय ब्रोकरेज हाऊसनं पेटीएमचं रेटिंग अंडरपरफॉर्म ते आऊटपरफॉर्म केलं होतं. तसंच याचं टार्गेट प्राईज 450 रुपयांवरून 800 रुपये केलं होतं. पेटीएमच्या शेअर्समध्ये कामकाजादरम्यान तेजीही दिसून आली होती. पेटीएमच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांकी पातळी 915 रुपये आणि नीचांकी पातळी 439.60 रुपये आहे.
नीचांकी पातळीपेक्षा ९० टक्क्यांनी वधारले
गेल्या काही महिन्यांपासून पेटीएमच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी बीएसईवर शेअर 439.60 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर 27 जून 2023 रोजी बीएसईवर 858 रुपयांवर होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 90 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या 6 महिन्यांत यात 67 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. महिन्यातभरात त्यात 23 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
दोन निगेटिव्ह रिस्क
विदेशी ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीच्या म्हणण्यानुसार पुढे जाऊन शेअरसाठी 2 मोठे ओव्हरहँग्स आणि निगेटिव्ह रिस्क्स आहेत. Ant फायनॅन्शिअल, कंपनीतील आपली २५ टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. हे स्टॉकसाठी ओव्हरहँग होऊ शकतं. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रिीजच्या एजीएममध्ये जिओ फायनॅन्शिअलशी निगडीत घोषणा दुसरी धोका असू शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)