Groww Technical Glitch : ब्रोकरेज प्लॅटफॉर्म ग्रोच्या युजर्सना आज कामकाजादरम्यान पुन्हा अडचणींना सामोरं जावं लागलं. ज्यामुळे अनेक युजर्सना ऑर्डर प्लेस करण्यासोबतच डिमॅट बॅलन्स पाहण्यात अडचणी येत होत्या.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर युझर्सनी यासंदर्भात तक्रार दाखल केली. आपण आपला डीमॅट बॅलन्स वापरण्यास वापरू शकत नाही, असं एका युझरनं ग्रोला टॅग करत लिहिलं तर आणखी एका युजरनं ग्रो वर आपल्याला ऑर्डर प्लेस करता येत नसल्याची तक्रार केली. आपल्या खात्यात पैसे असूनही ग्रो मला आणि पैसे त्यात अॅड करायला सांगत असल्याचं त्यानं म्हटलं.
ब्रोकरेज प्लॅटफॉर्मनं प्रतिसाद दिला
या सर्व तक्रारींना उत्तर देताना ब्रोकरेज प्लॅटफॉर्म ग्रो नं आपल्याला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ती लवकरच सोडविण्याचं काम ही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच होत असलेल्या गैरसोयीबद्दल ग्रो नं दिलगिरीही व्यक्त केली.
यापूर्वीही अनेक अडचणी
अलीकडच्या काही महिन्यांत ग्रो आणि झिरोधासारख्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मना तांत्रिक अडचणींमुळे सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावं लागलं आहे. जूनमध्ये झिरोधाला अशाच समस्येला सामोरं जावे लागलं होतं. जेथे ऑर्डर देताना त्यांचे स्क्रीन फ्रिझ झाल्याचं युझर्सनं म्हटलं होतं.