Lokmat Money >शेअर बाजार > Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न

Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न

Defence Stocks : सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी सकारात्मक सुरुवात होऊनही शेअर बाजारात विक्रीचा दबाव होता. अशा परिस्थितीत संरक्षण क्षेत्रातील काही निवडक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 10:06 AM2024-11-19T10:06:28+5:302024-11-19T10:06:28+5:30

Defence Stocks : सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी सकारात्मक सुरुवात होऊनही शेअर बाजारात विक्रीचा दबाव होता. अशा परिस्थितीत संरक्षण क्षेत्रातील काही निवडक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक दिसत आहेत.

Brokerages are bullish on these 3 stocks including HAL garden rich shipbuilders bharat dynamics can deliver up to 95 per cent returns | Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न

Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न

Defence Stocks : सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी सकारात्मक सुरुवात होऊनही शेअर बाजारात विक्रीचा दबाव होता. अशा परिस्थितीत संरक्षण क्षेत्रातील काही निवडक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक दिसत आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स (HAL), भारत डायनॅमिक्स (BDL) आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स (GRS) यांच्यावर अँटिक स्टॉक ब्रोकिंगनं (Antique Stock Broking) खरेदीची शिफारस केली आहे. या कंपन्यांच्या आर्थिक निकालानंतर त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक दिसत आहे. गेल्या वर्षभरात या तिन्ही डिफेन्स पीएसयू शेअर्सनी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला असून येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स (HAL)

अँटिक ब्रोकिंगनं एचएएलवर (Hindustan Aeronotics) खरेदीची शिफारस केली आहे, परंतु शेअरची टार्गेट प्राईज ६,१४५ रुपयांवरून ५,९०२ रुपये प्रति शेअर केली आहे. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी हा शेअर ४,०८७ रुपयांवर बंद झाला आणि सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे ४५% वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने ९५ टक्के परतावा दिला असून २०२४ मध्ये आतापर्यंत ४८ टक्के वाढ झाली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या मार्केट सेल ऑफमध्ये हा शेअर जवळपास ८ टक्क्यांनी घसरला असून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या तुलनेत तो २८ टक्क्यांनी स्वस्त आहे.

भारत डायनॅमिक्स (BDL)

भारत डायनॅमिक्सवरील अँटिक ब्रोकिंगने (बीडीएल) खरेदीचा सल्ला कायम ठेवला असला तरी टार्गेट प्राइस १,५७९ रुपयांवरून १,३५७ रुपये प्रति शेअर करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर रोजी हा शेअर ९८९ रुपयांवर बंद झाला आणि सध्याच्या किमतीपेक्षा ३८% वाढ दिसून येऊ शकते. बीडीएलने गेल्या वर्षभरात ७० टक्के परतावा दिला असला, तरी अलीकडच्या महिन्यात त्यात सुमारे १५ टक्क्यांची घसरण झाली आहे. 

अँटिक ब्रोकिंगनुसार बीडीएल सध्या सप्लाय चेनच्या समस्यांना सामोरे जात आहे, परंतु दुसऱ्या तिमाहीत ऑर्डर एक्झिक्युशनमध्ये येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करता यावं यासाठी कंपनी भारतात महत्त्वाचे कम्पोनंट्स तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे. कंपनीकडे १९,००० कोटी रुपयांचा मोठा बॅकलॉग आहे आणि विशेषत: आकाश मिसाईलची निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे.

गार्डन रीच शिपबिल्डर्स (GRSE)

अँटिक ब्रोकिंगनं गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्सला (GRSE) बाय रेटिंग दिलं आहे, मात्र त्याची टार्गेट प्राइस २,०९२ रुपयांवरून १,७८३ रुपये प्रति शेअर करण्यात आलीये. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी हा शेअर १,४०३ रुपयांवर बंद झाला आणि सध्याच्या पातळीवरून सुमारे २८% परतावा मिळण्याची शक्यता आहे. या शेअरने यंदा आतापर्यंत तब्बल ५८ टक्के परतावा दिला असून गेल्या वर्षभरात ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अँटिक ब्रोकिंगच्या म्हणण्यानुसार जीआरएसईचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत आणि कंपनीकडे २४ प्लॅटफॉर्म तयार करण्याची क्षमता आहे. कंपनीचा सध्याचा ऑर्डर बॅकलॉग २४,२२८ कोटी रुपये आहे, ज्यात अंमलबजावणीसुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. कंपनीनं आगामी काळात जहाजबांधणी आणि ग्रीन एनर्जी प्लॅटफॉर्मवरही लक्ष केंद्रित केले आहे, जे वाढीस मजबूत समर्थन देऊ शकतात.

(टीप : यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Brokerages are bullish on these 3 stocks including HAL garden rich shipbuilders bharat dynamics can deliver up to 95 per cent returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.