ब्रोकिंग प्लॅटफॉर्म झिरोदा (Zerodha) आज पुन्हा एकदा काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झालं होतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर युजर्सनं याबाबत तक्रारी केल्या. या आऊटेजमुळे इंडिया सिमेंटसारखे स्टॉक्स, जे आता F&O निर्बंधांतर्गत येत नाही, ते निर्बंधांतर्गत दिसत होते. यामुळे काही काळ ऑर्डर देणंही बंद झालं, त्यानंतर ब्रोकिंग प्लॅटफॉर्म पुन्हा काम करू लागलं.
यापूर्वी ३ जून रोजी झिरोदाच्या युझर्सना अशाच समस्येचा सामना करावा लागला होता. जेव्हा लोकसभा निवडणुकांच्या मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे संकेत देणारे एक्झिट पोल आल्यानंतर देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक विक्रमी स्तरावर पोहोचले होते, तेव्हा अशी समस्या आली होती.
सोशल मीडिया युझर्स काय म्हणाले?
एका सोशल मीडिया युझरनं झिरोदा, रिटेल आणि टेक्निकल गडबडीची कहाणी असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. तर एका महत्त्वाच्या दिवशी झिरोदा बंद झालं हे अतिशय चुकीचं आहे. यापुढे कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, असं म्हणत एका युझरनं संताप व्यक्त केला.
तर एका युझरनं खिल्ली उडवत झिरोदा डाऊन आहे का नाही हे पाहण्यासाठी लोक ट्विटरवर येत आहेत असं म्हटलं.