Join us  

बीएसईनं साजरा केला १४९ वा स्थापना दिवस, नवा लोगोही आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 2:20 PM

बीएसई पुढील वर्षी आपल्या स्थापनेची १५० वर्ष साजरे करणार आहे.

आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज BSE (BSE) ने सोमवारी आपला १४९ वा स्थापना दिवस साजरा केला. अशा प्रकारे बीएसई आपल्या स्थापनेची दीडशे वर्षे पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आले आहे. बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉलमध्ये १४९ वा स्थापना दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पारंपरिक बेल वाजवून सोहळ्याची सुरुवात झाली. 

१५० वर्षांचा टप्पा गाठण्यापूर्वी बीएसईनं आपला नवीन लोगोही लाँच केला. बीएसईचे अध्यक्ष एस.एस. मुंद्रा यांच्या हस्ते या नव्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बीएसई आणि आयसीसीएलचे बोर्ड आणि समिती सदस्य उपस्थित होते. "बीएसईनं आपल्या इनोव्हेशन, लर्निंग आणि अनलर्निंगच्या माध्यमातून दिवसेंदिवस अधिक सक्षम होण्याचा प्रवास कायम ठेवला आहे," अशी प्रतिक्रिया एस.एस. मुंद्रा यांनी यावेळी दिली. 

दरम्यान,यावेळी बीएसईचे एमडी आणि सीईओ सुंदररामन रामामूर्ती यानी यांनी नव्या लोगोचा अर्थ उलघडून सांगितला. हा लोगो आकाश, अग्नी, जल, वायू आणि पृथ्वी यांचा संगम असल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :शेअर बाजार