Lokmat Money >शेअर बाजार > Mukesh Ambani यांच्या जिओ फायनान्शिअलसाठी BSE नं बदलला नियम, शेअर्समध्ये तुफान तेजी

Mukesh Ambani यांच्या जिओ फायनान्शिअलसाठी BSE नं बदलला नियम, शेअर्समध्ये तुफान तेजी

बीएसईनं नॉन बँकिंग फायनान्शिअल सेवा कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेससाठी मोठा बदल केलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 02:01 PM2023-09-04T14:01:07+5:302023-09-04T14:01:24+5:30

बीएसईनं नॉन बँकिंग फायनान्शिअल सेवा कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेससाठी मोठा बदल केलाय.

BSE changes rules for Mukesh Ambani s Jio Financial services circuit limit shares surge bse nse | Mukesh Ambani यांच्या जिओ फायनान्शिअलसाठी BSE नं बदलला नियम, शेअर्समध्ये तुफान तेजी

Mukesh Ambani यांच्या जिओ फायनान्शिअलसाठी BSE नं बदलला नियम, शेअर्समध्ये तुफान तेजी

दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडच्या (Jio financial Services) शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. आता मुंबई शेअर बाजारानं या कंपनीच्या सर्किट लिमिटमध्ये बदल केलाय. हा बदल आजपासून लागू करण्यात आलाय. याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवरही दिसून येत आहे. Jio Financial च्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान ६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दिसून आली.

बीएसईनं नॉन बँकिंग फायनान्शिअल सेवा कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अपर लिमिटमध्ये  (Jio Financial Circuit Limit) बदल करण्याची घोषणा केली होती. हे बदल ४ सप्टेंबर २०२३ पासून लागू करण्यात आलेय. आता या शेअरचं सर्किट लिमिट ५ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के करण्यात आलंय. एक्सचेंजमध्ये कोणत्याही शेअरमधील अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी एक सर्किट फिल्टर सिस्टमचा वापर करण्यात येतो. दिवसभरातील कामकाजादरम्यान याच मर्यादेत शेअरमधील चढ-उतार होतात.

शेअरमध्ये तेजी
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये नवं लिमिट निश्चित झआल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत होती. दरम्यान, लिस्टिंग डे नंतर कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण दिसून आली होती. वृत्त लिहिस्तोवर कंपनीचा शेअर २५५.७० रुपयांवर ट्रेड करत होता.

Web Title: BSE changes rules for Mukesh Ambani s Jio Financial services circuit limit shares surge bse nse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.