Join us  

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर; पहिल्यांदा BSE ची मार्केट व्हॅल्यू 4 ट्रिलियन पार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 3:40 PM

BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar : भारतीय शेअर बाजाराने भारताच्या GDP पेक्षा जास्त वाढ नोंदवून पाचवे स्थान गाठले आहे.

BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar : भारतीय शेअर बाजाराने नवीन उंची गाठली आहे. मंगळवारी Stock Market च्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(BSE) मार्केट कॅपिटलायझेशन आपल्या ऑल टाइम हायवर, म्हणजेच 4.1 ट्रिलियन डॉलर्स किंवा 3,33,26,881.49 कोटी रुपयांवर पोहेचले. हा आकडा भारताच्या GDP पेक्षाही जास्त आहे. या आकडेवारीसह भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) जगातील पाचव्या क्रमांकाचे शेअर बाजार बनले आहे. भारतापेक्षा जास्त मार्केट कॅप अमेरिका, चीन, जपान आणि हॉन्ग-कॉन्गचे आहे. 

पाच सर्वात मौल्यवान स्टॉक मार्केट

  • देश                     मार्केट व्हॅल्यू
  • अमेरिका             48 ट्रिलियन डॉलर 
  • चीन                   10.7 ट्रिलियन डॉलर
  • जपान                5.5 ट्रिलियन डॉलर 
  • हॉन्ग कॉन्ग          4.7 ट्रिलियन डॉलर 
  • भारत                 4.1 ट्रिलियन डॉलर

अर्थव्यवस्थेसह शेअर बाजार सूसाटएकीकडे भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढत आहे आणि जागतिक बँक, IMF, S&P या सर्व रेटिंग एजन्सींनी भारताच्या या गतीवर विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या तेजीवर नजर टाकल्यास, दोन वर्षांपूर्वी मे 2021 मध्ये, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 3 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले होते आणि आता 4 ट्रिलियन डॉलर्सचा आकडा ओलांडला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक मूल्यभारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचे तर, ती सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर आहे आणि या आकडेवारीसह, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. बीएसईचे मार्केट कॅप यापेक्षा 0.4 ट्रिलियन डॉलर्सने वाढले आहे. रँकिंगच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार दोन्ही पाचव्या स्थानावर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून BSE MCap मध्ये $600 अब्ज पेक्षा जास्त उसळी पाहायला मिळाली आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक