Join us  

रिलायन्स, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव; सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 4:15 PM

Share Market Update: शेअर बाजारात घसरण होऊनही बीएसईचे मार्केट कॅप ३८,००० कोटी रुपयांच्या उसळीसह ४६३.९० लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे.

Stock Market : गेल्या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. मंगळवारी सकाळच्या व्यापारात चांगली सुरुवात झाली असली तरी दिवसभरात विक्रीचा दबाव वाढल्याने बाजार घसरणीसह बंद झाला. बाजारातील ही घसरण ऑटो, आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये नफा बुकिंगमुळे झाली आहे. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदीमुळे उत्साह होता. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स १५३ अंकांनी घसरून ८१,८२० वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१ अंकांच्या घसरणीसह २५०५७ अंकांवर बंद झाला.

या क्षेत्रात चढउतारआजच्या व्यवहारात बँकिंग, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, एनर्जी, कमोडिटीजच्या शेअर्समध्ये विक्री झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १२१ अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक २११ अंकांनी वधारला.

आज कोणी खाल्ला भाव?बीएसईच्या ३० शेअर्सपैकी ९ शेअर्स वाढीसह बंद झाले तर २१ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी १८ वाढीसह आणि ३० घसरणीसह बंद झाले. २ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. वाढत्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक १.९५ टक्के, भारती एअरटेल १.२६ टक्के, एशियन पेंट्स १.२० टक्के, अदानी पोर्ट्स ०.७१ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.६८ टक्के, एचसीएल टेक ०.५८ टक्के, एनटीपीसी ०.२७ टक्क्याच्या वाढीसह बंद झाला.

इराण-इस्रायल युद्धाचं सावटइराण आणि इस्रायलमध्ये युद्धाची ठिणगी पडली असून याचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. सध्या कच्चे तेलाचे भाव घसरले असले तरी ते कधीही भडकू शकतात. तर दुसरीकडे इस्रायल इराणवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास इतर व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक