Join us

Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार सावरला; या क्षेत्रातील शेअर्समुळे रिकव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 3:58 PM

Share Markets : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला. दिवसभरातील खरेदीमुळे बाजार हिरव्या रंगात बंद झाला.

Share Markets : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सकाळी बाजारात जोरदार घसरण झाली. पण दिवसभराच्या व्यवहारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदीच्या खालच्या पातळीतून बाजारात परतल्यामुळे बाजाराने आपले नुकसान भरून काढले. बँकिंग-ऑटो आणि फार्मा शेअर्समधील खरेदीमुळे ही रिकव्हरी बाजारात आली आहे. खालच्या पातळीवरून सेन्सेक्समध्ये १००० अंकांची आणि निफ्टीमध्ये ३०० अंकांची झेप घेतली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स २१८ अंकांच्या घसरणीसह ८१,२२४ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०४ अंकांच्या उसळीसह २४,८५४ अंकांवर बंद झाला.

बाजाराची घसरणीने सुरुवातसलग तिसऱ्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. शुक्रवारी शेअर बाजारातील घसरणीने पुन्हा व्यवहार सुरू झाले. सुमारे ३०० अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स ८०,६०० च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी ८० अंकांनी घसरुन २४,६७५ च्या आसपास व्यवहार करत होता. येथून इंडेक्स सुमारे १३० अंकांनी घसरला. निफ्टी बँक हिरव्या रंगात उघडला होता. पण इथेही घसरण झाली आणि निर्देशांक ६० अंकांनी घसरला आणि ५१,२२० च्या आसपास घसरला. मिडकॅप निर्देशांकात मोठी घसरण झाली. बाजार उघडला तेव्हा सुमारे ४०० अंकांचे नुकसान झाले होते. परंतु, त्यानंतर निर्देशांक ६०० अंकांच्या तोट्याने चालत होता.

या शेअर्समध्ये चढउतारसेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १९ शेअर्स वाढीसह आणि ११ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३३ वाढीसह तर १७ शेअर्स घसरणीसह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये अ‍ॅक्सिस बँक ५.७५ टक्के, विप्रो ३.५९ टक्के, आयशर मोटर्स २.९८ टक्के, आयसीआयसीआय बँक २.९० टक्के, श्रीराम फायनान्स २.८० टक्के, हिंदाल्को २.५० टक्के, एचडीएफसी लाइफ २.४० टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये इन्फोसिस ४.२२ टक्के, ब्रिटानिया १.९८ टक्के, एशियन पेंट्स १.८७ टक्के, नेस्ले १.२१ टक्के, टेक महिंद्रा ०.८२ टक्के, बजाज ऑटो ०.७७ टक्के, एचसीएल टेक ०.६० टक्के वाढीसह बंद झाले.

सेक्टरॉल अपडेट बाजारातील ही वाढ बँकिंग स्टॉक्समुळे झाली आहे. निफ्टी बँक ८०५ अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. याशिवाय ऑटो सेक्टर, फार्मा सेक्टर, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर सेक्टरचे शेअर्स तेजीने बंद झाले. घसरणाऱ्या क्षेत्रांपैकी सर्वात मोठी घसरण आयटी शेअर्समध्ये झाली आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक ६२७ अंकांनी घसरून बंद झाला आहे. याशिवाय तेल आणि वायू, एफएमसीजी शेअर्समध्येही विक्री दिसून आली. सकाळच्या व्यवहारात मोठ्या नुकसानासह व्यवहार करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स आज हिरव्या रंगात परतले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार