Join us

BSE Share Price: एका घोषणेनं शेअरमधील घसरण थांबली; ६ टक्क्यांच्या घसरणीनंतर जोरदार रिकव्हरी, कारण काय?

By जयदीप दाभोळकर | Updated: March 28, 2025 11:03 IST

BSE Share Price: गेल्या तीन चार दिवसांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरणीनंतर बीएसईच्या शेअर्समध्ये आता चांगली रिकव्हरी दिसून येत आहे. पाहा काय आहे यामागचं कारण?

BSE Share Price: गेल्या तीन चार दिवसांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरणीनंतर बीएसईच्या शेअर्समध्ये आता चांगली रिकव्हरी दिसून येत आहे. जोरदार खरेदीमुळे त्यात सुमारे सहा टक्क्यांची वाढ झाली. बीएसईच्या पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअरच्या (BSE Bonus Share) प्रस्तावावर चर्चा केली जाईल, असं जाहीर केल्यानंतर ही तेजी आली. ३० मार्च रोजी ही बैठक होणार आहे. या घोषणेनंतर आज कामकाजादरम्यान बीएसईवर शेअर १४.६१ टक्क्यांनी वधारून ५३५७ रुपयांवर पोहोचला.

यापूर्वीही दिलाय बोनस शेअर

बोनस इश्यूच्या घोषणेनंतर बीएसईच्या शेअर्समध्ये (BSE Share) तीन चार दिवसांपासून तीन दिवसांची घसरण संपुष्टात आली. बोनस इश्यूसाठी कोणताही रेश्यो किंवा रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आलेली नाही. बीएसईने बोनसच्या मुद्द्यावर घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये बोनस शेअर्स देण्यात आले होते. २१ मार्च २०२२ ही एक्स डेट निश्चित करण्यात आली होती आणि त्यावेळी १ शेअरवर २ शेअर्स देण्यात आले होते. त्यावेळी बोनस रेश्यो १:२ होता, म्हणजे प्रत्येक एका शेअरमागे भागधारकांना दोन बोनस मिळाले.

वर्षभरात शेअरची स्थिती काय?

बीएसईच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना (BSE Share Investors) मोठा नफा मिळवून दिलाय. त्याचे शेअर्स ३ फेब्रुवारी २०१७ रोजी एनएसईवर लिस्ट झाले आणि आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास १३ पटीनं वाढले आहेत. आता वर्षभरातील शेअर्सच्या हालचालींबद्दल बोलायचं झालं तर शेअर्सनं गुंतवणूकदारांना भरपूर पैसे कमावून दिलेत. गेल्या वर्षी २३ जुलै २०२४ रोजी तो २११५ रुपयांवर होता, जो शेअर्ससाठी एका वर्षातील नीचांकी स्तर आहे. या नीचांकी पातळीवरून तो सहा महिन्यांत सुमारे १९० टक्क्यांनी वधारून २० जानेवारी २०२५ रोजी ६१३३.४० रुपयांवर पोहोचला, जो या शेअर्सचा विक्रमी उच्चांक आहे. मात्र, शेअरची तेजी इथेच थांबली असून सध्या या विक्रमी उच्चांकावरून २४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली .

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक