Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारातील तेजीदरम्यान एक्सपर्ट्स Mankind Pharma सह 'या' ३ शेअर्सवर बुलिश, म्हणाले...

शेअर बाजारातील तेजीदरम्यान एक्सपर्ट्स Mankind Pharma सह 'या' ३ शेअर्सवर बुलिश, म्हणाले...

शेअर बाजारातील तेजीदरम्यान एक्सपर्ट मॅनकाइंड फार्मासह ३ तीन शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत. पाहा कोणते आहेत हे शेअर्स.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 02:46 PM2024-07-29T14:46:14+5:302024-07-29T14:47:29+5:30

शेअर बाजारातील तेजीदरम्यान एक्सपर्ट मॅनकाइंड फार्मासह ३ तीन शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत. पाहा कोणते आहेत हे शेअर्स.

Bullish on these 3 stocks with experts Mankind Pharma l and t hul during the stock market boom | शेअर बाजारातील तेजीदरम्यान एक्सपर्ट्स Mankind Pharma सह 'या' ३ शेअर्सवर बुलिश, म्हणाले...

शेअर बाजारातील तेजीदरम्यान एक्सपर्ट्स Mankind Pharma सह 'या' ३ शेअर्सवर बुलिश, म्हणाले...

जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ दिसून आली. सोमवारी दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीच्या सर्व क्षेत्रांचे निर्देशांक ग्रीन झोनमध्ये होते,तर दुसरीकडे  पीएसयू बँकेच्या निफ्टी निर्देशांकातही तेजी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल चांगला आहे. शेअर बाजारातील तेजीदरम्यान एक्सपर्ट मॅनकाइंड फार्मासह ३ तीन शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत.

मॅनकाइंड फार्मा, एल अँड टी आणि एचयूएलच्या शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश दिसून येत आहेत. मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं या शेअर्सचं टार्गेट प्राईझ वाढवलं असून त्याला बाय रेटिंग दिलं आहे.

मॅनकाइंड फार्मा - या शेअरला मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं २६५० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलं असून त्याला बाय रेटिंग दिलंय. हे टार्गेट सध्याच्या किंमतीपेक्षा २८ टक्क्यांनी अधिक आहे. मॅनकाइंड फार्मानं भारत सिरम व्हॅक्सिनच्या अधिग्रहणासाठी सहमती दर्शवली आहे. यामुळे पोर्टफोलिओच्या विस्तारासह एक R&D टेक प्लॅटफॉर्म, इनहाऊस कॉम्लेक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षमता आणि मजबूत संस्थात्मक पोहोच प्रदान करणार असंही ब्रोकरेजनं म्हटलंय.

एल अँड टी - ब्रोकरेजनं एल अँड टीला ४१५० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलं आहे. हे सध्याच्या किंमतीपेक्षा १२ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनी ऑफशोअर विंड प्रोजेक्ट्स सारख्या नवीन क्षेत्रांमध्येदेखील संधी पाहत आहे. या ठिकाणी कंपनीला १०० मिलियन डॉलर्सची ऑर्डरही मिळाली आहे. याशिवाय कंपनी ग्रीन हायड्रोजन आणि न्युक्लिअर प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शनमध्येही संधी शोधत आहे, असं ब्रोकरेजनं म्हटलंय.

एचयूएल - ब्रोकरेजनं एचयूएलला ३२५० रुपयांचं टार्गेटसह बाय रेटिंग दिलं आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा हे २० टक्क्यांनी अधिक आहे. विस्तृत प्रोडक्ट बास्केट आणि सर्व प्राईज सेगमेंटमधील उपस्थितीमुळे कंपनीला स्थिर वाढ मिळत आहे. आर्थिक वर्षात महसूलातील वाढही अपेक्षित आहे, असं ब्रोकरेजनं म्हटलंय.

(टीप : यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Bullish on these 3 stocks with experts Mankind Pharma l and t hul during the stock market boom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.