Join us

TCS च्या गुंतवणूकदारांना बंपर नफा, कंपनी १५% प्रीमिअमवर शेअर बायबॅक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 10:56 AM

दिग्गज आयटी कंपनी टीसीएसनं (TCS) सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना शेअर बायबॅकची घोषणा केली

TCS Share Buyback : दिग्गज आयटी कंपनी टीसीएसनं (TCS) सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी १५ टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे. त्यानुसार कंपनी सुमारे १७,००० कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. टीसीएसनं ११ ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार शेअर बायबॅक ४,१५० रुपये प्रति शेअर या दरानं केला जाईल. बायबॅक अंतर्गत, कंपनी आपले शेअर्स भागधारकांकडून खरेदी करते. भागधारकांना त्यांचे सर्व किंवा काही भाग बायबॅकमध्ये कंपनीला विकण्याची परवानगी आहे.

या बायबॅक अंतर्गत टीसीएस ४,०९,६३,८५५ शेअर्स खरेदी करेल, हे एकूण इक्विटीच्या १.१२ टक्के इतके आहे. बायबॅक साईजमध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट, लागू कर आणि इतर इंसिडेंटल आणि संबंधित खर्चाचा समावेश नाही. गेल्या सहा वर्षांत भारतातील सर्वात मोठ्या आयटी सर्व्हिसेस कंपनीनं केलेला हा पाचवा शेअर बायबॅक आहे. कंपनीनं अशा चार बायबॅकमध्ये ६६,००० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केलेत. “बायबॅकसाठी पोस्टल बॅलेटद्वारे विशेष ठरावाद्वारे शेअरहोल्डरची मंजुरी आवश्यक असेल,” असं  टीसीएसनं एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटलंय.

२०१७ मध्ये पहिल्यांदा बायबॅकटीसीएसनं फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिल्यांदा आपले शेअर्स विकत घेतले. सध्याच्या किमतीच्या १८ टक्के प्रीमियमनं १६ हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. यानंतर जून २०१८ आणि ऑक्टोबर २०२० मध्ये अनुक्रमे १८ आणि १० टक्के प्रीमियमनं १६००० कोटी रुपयांचे दोन बायबॅक करण्यात आले. गेल्या वेळी आयटी कंपनीनं जानेवारी २०२२ मध्ये १७ टक्के प्रीमियमनं भागधारकांकडून १८,००० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. टीसीएसची २०२३ ची बायबॅक किंमत मागील बायबॅक प्राईज ४,५०० रुपयांपेक्षा कमी आहे.

टॅग्स :टाटाशेअर बाजार