Lokmat Money >शेअर बाजार > बंपर नफा! IKIO Lighting च्या आयपीओनं केली गुंतवणूकदारांची चांदी, जबरदस्त लिस्टिंग

बंपर नफा! IKIO Lighting च्या आयपीओनं केली गुंतवणूकदारांची चांदी, जबरदस्त लिस्टिंग

आयकियो लायटिंगच्या शेअरची शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:15 AM2023-06-16T11:15:15+5:302023-06-16T11:16:24+5:30

आयकियो लायटिंगच्या शेअरची शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली.

Bumper Profits Investors huge profit with IKIO Lighting IPO stunning listing bse nse share market investment | बंपर नफा! IKIO Lighting च्या आयपीओनं केली गुंतवणूकदारांची चांदी, जबरदस्त लिस्टिंग

बंपर नफा! IKIO Lighting च्या आयपीओनं केली गुंतवणूकदारांची चांदी, जबरदस्त लिस्टिंग

आयकियो लायटिंगच्या शेअरची (IKIO Lighting) शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीचे शेअर्स जबरदस्त प्रीमियमवर लिस्ट झाले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर आयकियो लायटिंगचे शेअर्स 37.7 टक्के प्रीमियमसह 392.50 रुपयांवर लिस्ट झाले. त्याच वेळी, हा शेअर बीएसईवर 391 रुपयांवर लिस्ट झाला. कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात हा शेअर एनएसईवर शेअर 412 रुपयांपर्यंत गेला. लिस्टिंग झाल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अशा प्रकारे ज्यांनी या आयपीओमध्ये पैसे गुंतवले त्यांना 41.77 टक्के नफा मिळाला.

आयकियो लायटिंग लिमिटेडनं आपल्या शेअर्ससाठी 270 ते 285 रुपयांचा प्राईज बँड निश्चित केला होता. याच्या एका लॉटमध्ये 52 शेअर्स होते. या प्रकारे गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान 14820 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. रिटेल गुंतवणूकदारांसाठी कमाल मर्यादा 13 लॉटची होती.

काय करते कंपनी?
नोएडा स्थित ही कंपनी एलईडी लाईट्सशी संबंधित उपाय पुरवते. कंपनीच्या उत्पादनांची एलईडी लाइटिंग, रेफ्रिजरेशन लाइट्स, एबीएस पाइपिंगसह इतर श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी, तसंच त्यांच्या पूर्ण मालकीच्या आयकियो सोल्युशन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरण्यात येणार आहे.

Web Title: Bumper Profits Investors huge profit with IKIO Lighting IPO stunning listing bse nse share market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.