Join us  

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये बंपर तेजी; इंडिया सिमेंटच्या बंपर तेजी, सीई इन्फोचे शेअर्स आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 4:02 PM

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२१ अंकांच्या वाढीसह २३८४२ च्या पातळीवर बंद झाला.

बीएसई सेन्सेक्स ६२१ अंकांच्या वाढीसह ७८६७४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२१ अंकांच्या वाढीसह २३८४२ च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात तेजी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे निर्देशांकातील हेवीवेट शेअर्समध्ये झालेली वाढ. 

शेअर बाजारात इंडिया सिमेंट, सीईएससी, एबीबी पॉवर, टिटागड वॅगन्स, ३६० वन वाम, जीआरएसई आणि आयआयएफएल फायनान्सचे समभाग सर्वाधिक वधारले. तर सीई इन्फो सिस्टीम्स, एनएमडीसी, एमसीएक्स इंडिया, केम प्लास्ट, सानमार, रतन इंडिया इन्फ्रा, मायक्रोटेक डेव्हलपर्स आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे समभाग सर्वाधिक घसरले. 

रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी तीन टक्क्यांची वाढ झाली आणि यामुळे सेन्सेक्समध्ये बंपर वाढ नोंदवण्यात आली. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीनं नवा उच्चांक गाठला आहे. बुधवारी हुडको आणि इरेडाचे शेअर्स १० टक्क्यांनी वधारले आहेत. व्होडाफोन आयडिया, भारती हेक्साकॉम, इंडस टॉवर्स आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. कमी लाभांशाची बातमी आल्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये एक टक्का घसरण नोंदविण्यात आली आहे.

पीएसयू शेअर्सची स्थिती

बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजात पीएसयू शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. बुधवारी गार्डन रीच शिप बिल्डर, टिटागड रेल, इरेडा, माझगाव डॉक, टॅक्स मेको रेल, भारत डायनॅमिक्स, वेस्ट कोस्ट पेपर, एनटीपीसी लिमिटेड, एसजेव्हीएन, कोचीन शिपयार्ड, बीईएमएल, रेल विकास निगम लिमिटेड, भेल, ग्रेट ईस्टर्न शिपिंग आणि एनएचपीसी लिमिटेडचे शेअर्स वधारले, तर पॉवर ग्रिड, कोल इंडिया, गेल इंडिया, आयआरएफसी, हिंदुस्थान पेट्रोलियम, आयआरसीटीसी, कंटेनर कॉर्पोरेशन, इरकॉन इंटरनॅशनल, राइट्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, रेलटेल कॉर्पोरेशन, एचएएल, एनएमडीसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मल्टीबॅगर शेअर्समध्ये तेजी

गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ५ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये बंद झाले, तर पाच शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले. एनडीटीव्ही, अंबुजा सिमेंट आणि अदानी टोटल गॅस मध्ये एक टक्का तर अदानी ग्रीन एनर्जीमध्ये एक टक्का घसरण झाली. इंडियन ऑइल, पंजाब नॅशनल बँक, साऊथ इंडियन बँक, पेटीएम, स्पाइसजेट, बीसीएल इंडस्ट्रीज, कजारिया सिरॅमिक्स आणि सर्वोटेक पॉवर या कंपन्यांचे शेअर्स बुधवारच्या व्यवहारात सर्वाधिक घसरले. बुधवारी बीएसई सेन्सेक्सनं ७८७०० ची पातळी ओलांडली, तर निफ्टीनं २३९०० ची पातळी गाठली आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक