Lokmat Money >शेअर बाजार > महाराष्ट्र निवडणुकीनंतर शेअर बाजारात उसळी; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा, ही आहेत ५ प्रमुख कारणे

महाराष्ट्र निवडणुकीनंतर शेअर बाजारात उसळी; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा, ही आहेत ५ प्रमुख कारणे

Share Market : दीड महिन्याच्या अस्थिरतेनंतर सोमवारी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये १२०० अंकांची वाढ पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 11:57 AM2024-11-25T11:57:48+5:302024-11-25T12:01:41+5:30

Share Market : दीड महिन्याच्या अस्थिरतेनंतर सोमवारी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये १२०० अंकांची वाढ पाहायला मिळाली.

bumper rally in stock market after maharashtra elections investors got profit of rs 9 lakh crore | महाराष्ट्र निवडणुकीनंतर शेअर बाजारात उसळी; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा, ही आहेत ५ प्रमुख कारणे

महाराष्ट्र निवडणुकीनंतर शेअर बाजारात उसळी; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा, ही आहेत ५ प्रमुख कारणे

Share Market : गेल्या दीड महिन्यापासून अस्थिर असणाऱ्या शेअर बाजारात आज चांगलीच उसळी पाहायला मिळाली. महाराष्ट्रात महायुतीला सरकारला मोठं यश मिळाल्यानंतर शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी, २ दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीनंतर, सेन्सेक्स ८०,४०० च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी २४,३०० च्या वर व्यवहार करत आहे. दोन्हीमध्ये १.५ टक्क्यांहून अधिक वाढ दिसत आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यवसायात सर्वच क्षेत्रात वाढ दिसून येत आहे.

गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा
याआधी शुक्रवारीही शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. गेल्या २ व्यापार सत्रांमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड सर्व कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८.६६ लाख रुपयांची वाढ नोंदवली गेली, त्यानंतर ती ४४१.३७ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या विजयाचा परिणाम
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले, ज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीने २८८ पैकी २३३ जागा जिंकल्या, तर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी झारखंडमध्ये सत्तेवर परत आली आहे.

अदानींच्या शेअर्समध्ये तेजी
नुकतेच, लाचखोरी आणि फसवणुकीच्या प्लॅनिंगच्या आरोपाखाली अमेरिकेच्या अभियोगाने देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी विरुद्ध तपास आणि अटक वॉरंट जारी जारी केलं आहे. त्यानंतर अदानी शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली होती. मात्र, शुक्रवारी अदानी समूहातील शेअर्समध्ये पुन्हा उसळी पाहायला मिळाली. सोमवारी देखील अदानी शेअर्समध्ये ७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. गेल्या २ व्यापार दिवसांमध्ये, अदानी समूहाच्या शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये २८ बिलियन डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली होती.

MSCI मध्ये नोव्हेंबर महिन्यात बदल
एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये बीएसई, व्होल्टास, अल्केम लॅबोरेटरीज, कल्याण ज्वेलर्स आणि ओबेरॉय रियल्टी यांचा समावेश केल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे.

हेवीवेट स्टॉक्समध्ये वाढ
सोमवारी हेवीवेट शेअर्सच्या वाढीमुळे बाजार १,२०० हून अधिक अंकांनी वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि एसबीआयने सेन्सेक्सच्या वाढीमध्ये ७०० हून अधिक पॉइंट्सचे योगदान दिले. या शेअर्समध्ये २% ते ३.५% वाढ झाली.

Web Title: bumper rally in stock market after maharashtra elections investors got profit of rs 9 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.