Lokmat Money >शेअर बाजार > अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 36 महिन्यात झाले करोडपती...

अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 36 महिन्यात झाले करोडपती...

Mutibagger Stock : शेअर मार्केटमध्ये एखादा स्टॉक तुम्हाला बंपर कमाई करुन देतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 06:42 PM2023-08-17T18:42:48+5:302023-08-17T18:43:40+5:30

Mutibagger Stock : शेअर मार्केटमध्ये एखादा स्टॉक तुम्हाला बंपर कमाई करुन देतो.

Bumper Return: A stock of just Rs 5 has done well; Millionaire in just 36 months | अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 36 महिन्यात झाले करोडपती...

अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 36 महिन्यात झाले करोडपती...

Mutibagger Stock : शेअर मार्केट जोखमीची गुंतवणूक आहे, पण कधीकधी एखादा शेअर तुम्हाला तगडी कमाई करुन देऊ शकतो. मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना एका झटक्यात बंपर रिटर्न्स मिळवून दिले आहेत. असाच एक स्टॉक आहे टेलरमेड रिन्युएबल्सचा (Taylormade Renewables), ज्याने गुंतवणूकदारांना अवघ्या 36 महिन्यांत करोडपती केले.

रिन्युएबल एनर्जी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या Taylormade Renewables चे स्टॉक्स मल्टीबॅगर सिद्ध झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या शेअरने दीर्घ मुदतीत नव्हे तर केवळ तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कालावधीत शेअरच्या किमतीत तब्बल 14,000 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली गेली. 19 ऑगस्ट 2020 रोजी या शेअरची किंमत 4.40 रुपये होती, जी गुरुवारी(17 ऑगस्ट) 719 रुपयांच्या पातळीवर बंद झाली.

गुरुवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. दोन्ही बाजार निर्देशांकांनी दिवसभर रेड झोनमध्ये व्यवहार केले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 388.40 अंकांनी घसरुन 65,151.02 च्या पातळीवर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक (NSE निफ्टी) 99.75 अंकांनी घसरुन 19,365.25 च्या पातळीवर बंद झाला. बाजारात मोठी घसरण होऊनही टेलरमेड रिन्युएबल्सचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. दिवसाच्या अखेरिस शेअरला अप्पर सक्रिट लागले आणि शेअर 4.99 टक्के किंवा 34.20 रुपयांनी वाढून बंद झाला. 

एक लाख रुपयांचे दीड कोटी झाले
स्मॉलकॅप शेअर टेलरमेड रिन्युएबल्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर, 2018 पासून स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1800% परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना रॉकेटच्या गतीने श्रीमंत केले आहे. या कालावधीत 14000 टक्क्यांहून अधिक वाढीसह गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले. सुरुवातीला जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर त्याला आज दीड कोटी रुपये मिळतील.

16 ऑगस्ट 2020 रोजी शेअरची किंमत रु.4.40 होती. पुढच्या वर्षी 18 ऑगस्ट 2021 रोजी हा 7.30 रुपयांवर आला. त्यानंतर पुढच्या वर्षी 12 ऑगस्टला किंमत 12.26 रुपयांपर्यंत आली. गेल्या वर्षाच्या अखेरीस या शेअरमध्ये तेजी सुरू झाली आणि 30 डिसेंबर 2022 रोजी एक शेअर 38.25 रुपयांना विकला गेला. या वर्षी 26 मे पर्यंत हा स्टॉक 375.90 रुपयांवर पोहोचला होता आणि आता हा 719 रुपयांवर व्यवहार करत आहे. हा स्टॉक दररोज अप्पर सर्किटमध्ये व्यवहार करतोय.

(टीप- आम्ही फक्त शेअरच्या कमगिरीबद्दल माहिती देत आहोत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Bumper Return: A stock of just Rs 5 has done well; Millionaire in just 36 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.