Lokmat Money >शेअर बाजार > बम्पर परतावा : फक्त 7 रुपयांवरून 7000 वर पोहोचला हा शेअर, 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश

बम्पर परतावा : फक्त 7 रुपयांवरून 7000 वर पोहोचला हा शेअर, 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश

बजाज फायनान्सचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 7 रुपयांवरून 7000 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत 100000 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 02:10 PM2022-09-05T14:10:08+5:302022-09-05T14:18:23+5:30

बजाज फायनान्सचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 7 रुपयांवरून 7000 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत 100000 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.

Bumper returns bajaj finance limited Shares rise from just Rs 7 to Rs 7000 | बम्पर परतावा : फक्त 7 रुपयांवरून 7000 वर पोहोचला हा शेअर, 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश

बम्पर परतावा : फक्त 7 रुपयांवरून 7000 वर पोहोचला हा शेअर, 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश

बजाज ग्रुपच्या एका कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार काही वर्षांतच कोट्यधीश बनले आहेत. बजाज ग्रुपच्या या कंपनीचे नाव आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्सचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 7 रुपयांवरून 7000 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत 100000 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. बजाज फायनान्सच्या शेअरची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 8043.50 रुपये एवढी आहे. तर, 52 आठवड्यांतील लो-लेव्हल 5235.60 रुपये एवढी आहे.

बजाज फायनान्सच्या शेअर्सनी 1 लाख रुपयांचे केले 10 कोटीहून अधिक - 
बजाज फायनान्स (Bajaj Finance) चा शेअर 12 डिसेंबर 2008 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज (BSE)वर 6.99 रुपयांवर होता. यानंतर हा शेअर 5 सप्टेंबर 2022 रोजी बीएसईवर 7223.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 15 वर्षांपेक्षाही कमी काळात 100000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 12 डिसेंबर 2008 रोजी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि ते कायम ठेवले असते, तर आज त्याचे 10.3 कोटी रुपये झाले असते.

10 वर्षांत 103 रुपयांवरून 7000 च्या वर - 
बजाज फायनान्सच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीचा शेयर 31 ऑगस्ट 2012 रोजी बीएसईवर 102.29 रुपयांवर होता. तो आता 5 सप्टेंबर 2022 रोजी बीएसईवर 7223.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. जर एखाद्या वक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता त्याचे 70.62 लाख रुपये झाले असते. गेल्या 5 वर्षांत बजाज फायनान्सच्या शेअर्सनी 282 टक्के परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Bumper returns bajaj finance limited Shares rise from just Rs 7 to Rs 7000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.