Join us  

बम्पर परतावा! मद्य कंपनीच्या शेअरनं 1 लाखाचे केले 49 लाख, या दिग्गज इनव्हेस्टरनं खरेदी केले 9.50 लाख शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 7:05 PM

दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी एका मद्य कंपनीवर मोठा डाव लावला आहे. या कंपनीचे नाव आहे सोम डिस्टिलरीज अॅण्ड ...

दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी एका मद्य कंपनीवर मोठा डाव लावला आहे. या कंपनीचे नाव आहे सोम डिस्टिलरीज अॅण्ड ब्रुअरीज. डॉली खन्ना यांनी या कंपनीचे तब्बल 9,53,603 शेअर्स विकत घेतले आहेत. ट्रेंडलाइन डेटानुसार, मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत सोम डिस्टिलरीजमध्ये दिग्गज इनव्हेस्टर डॉली खन्ना यांचा वाटा 1.29 टक्के होता. याची किंमत 15 कुटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. सोम डिस्टिलरीजचा (Som Distilleries) शेअर गुरुवारी 2 टक्क्यांहून अधिकच्य घसरणीसह 151.65 रुपयांवर आहे.

1 लाख रुपयांचे झाले 49 लाखहून अधिक - सोम डिस्टिलरीजच्या शेअर्सनी सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 4815% एवढा परतावा दिला आहे. 4 मार्च 2005 रोजी सोम डिस्टिलरीजचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) 3.07 रुपयांवर ट्रेडिंग करत होते. 13 एप्रिल 2023 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 151.65 वर पोहोचले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 4 मार्च 2005 रोजी सोम डिस्टिलरीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत काय ठेवली असती, तर आता तिचे 49.39 लाख रुपये झाले असते. 

डॉली खन्ना यानी या कंपन्यांमधील हिस्सेदारी कमी केली -दिग्गज गुतवणूकदार डॉली खन्ना यांनी रामा फॉस्फेट्समधील गुंतवणूक 1 टक्क्यापेक्षाही कमी केली आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत रामा फॉस्फेस्ट्समध्ये डॉली खन्ना यांचा वाटा 1.54 टक्के एवढा होता. डॉली खन्ना यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत चेन्नई पेट्रोलियम कॉरपोरेशन आणि टीना रबड अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चरमधीलही वाटा अथवा हिस्सेदारीही कमी केली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार