शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गेल्या दहा वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे, फेज थ्री लिमिटेडचा. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षांत जवळपास 5,700 टक्क्यांचा बम्पर परतावा दिला आहे. तर गेल्या पाच वर्षांत 302 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
असे झाले 10 हजारचे 6 लाख रुपये -
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती होल्ड करून ठेवली असती, तर आज त्याचे 6 लाख रुपये झाले असते. faze three लिमिटेड घरगुती इंटीरिअर उत्पादनांची निर्मिती करते आणि कंपनीच्या उत्पादनांत बेडस्प्रेड, सजावटीचे कुशन्स, टेबलटॉप, स्कॅटर गलीचे, बाथमॅट आदींचा समावेश आहे.
faze three लिमिटेडमध्ये प्रमोटर्सचा वाटा 56.16 टक्के एवढा आहे. तर 43.84% वाटा पब्लिक शेअरहोल्डर्सचा आहे. मार्च तिमाहीपर्यंत दिग्गज गुतंवणूकदार आशीष कचोलिया यांचा या कंपनीत जवळपास 5.23% एवढा वाटा होता.
शेअरमध्ये येणार आणकी तेजी -
सध्या faze three लिमिटेडच्या शेअरची किंमत 384 रुपये एवढी असून या शेअरसंदर्भात एक्सपर्ट बुलिश आहेत. अरिहंत कॅपिटलचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक मायलिन वासुदेव यांनी या शेअरसाठी शॉर्ट टर्म टार्गेट किंमत 436-475 रुपये एवढी ठेवली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)