प्रसिद्ध पॅकेज्ड फूड कंपनी एडीएफ फूड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी बघायला मिळाली. बीएसईवर हा शेअर 17 ट्क्यांच्या तेजीसह 1020 रुपयांच्या आपल्या नव्या 52-आठवड्यांतील उच्च पातळीवर पोहोचला आहे. वर्ष 1999 मध्ये हा शेअर 5 रुपयांवर होता. अर्थात गेल्या 24 वर्षांत गुंतवणुकदारांकडून तब्बल 19000 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे.
एडीएफ फूड्सचे नेट प्रॉफिट गेल्या मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 20.3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये नोंदवल्या गेलेल्या एक वर्षआधीच्या तिमाहीदरम्यान 11.8 कोटी रुपयांवरून 71.8 टक्के अधिक आहे. नुकताच एडीएफ फूड्सने 5 रुपये प्रति शेअरच्या डिव्हिडंडची घोषणा केली होती. तसेच, स्टॉक स्प्लिटसंदर्भातही माहिती दिली होती.
दिग्गज गुंतवणूकदारांनी केलीय गुंतवणूक - मार्च तिमाहीदरम्यान कंपनीने 36.50% ची प्रमोटर शेअरहोल्डिंग, 9.38% ची FII हिस्सेदारी, 7.88% ची DII ची हिस्सेदारी आणि 46.24% ची सार्वजनिक हिस्सेदारीची सूचना दिली. एडीएफ फूड्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दिग्गज गुंतवणूकदार आशीष कचोलिया यांच्या जवळ कंपनीत 2,27,605 शेअर अथवा 1.04% हिस्सेदारी होती.
महत्वाचे म्हणजे एडीएफ फूड्स लिमिटेड ही एक अग्रणी जागतिक खाद्य निर्माता कंपनी आणि वितरक आहे. ही कंपनी अनेक देशात आपले उत्पादन विकते. यात, सॉस, लोणचे, चटणी, पेस्ट, रेडी-टू-कुक, रेडी-टू-ईट आदी उत्पादनांचा समावेश आहे.