Lokmat Money >शेअर बाजार > Buy, Sell or Hold: Bank Of Baroda च्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, एक्सपर्ट म्हणाले….

Buy, Sell or Hold: Bank Of Baroda च्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, एक्सपर्ट म्हणाले….

Buy, Sell or Hold Bank of Baroda Shares: उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सने रॉकेट स्पीड पकडला आहे. सोमवारी शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:31 AM2022-11-08T08:31:20+5:302022-11-08T08:32:51+5:30

Buy, Sell or Hold Bank of Baroda Shares: उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सने रॉकेट स्पीड पकडला आहे. सोमवारी शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.

Buy Sell or Hold Bank Of Baroda shares hit rocket speed experts say it is wise to buy bse nse multibagger share | Buy, Sell or Hold: Bank Of Baroda च्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, एक्सपर्ट म्हणाले….

Buy, Sell or Hold: Bank Of Baroda च्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, एक्सपर्ट म्हणाले….

उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे बँक ऑफ बडोदाचे शेअर्सने रॉकेट स्पीड पकडला आहे. सोमवारी बँकेच्या शेअर्सने 161.60 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा कोर प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग नफा (PPOP) 39 टक्क्यांनी वाढला आहे. 2023 या आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्के वाढीचा अंदाज बाजार तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

बँक ऑफ बडोदाच्या शेअर प्राईज हिस्ट्रीबद्दल बोलायचे झाल्यास, एका महिन्यात 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या स्टॉकने गेल्या 3 महिन्यांत 34 टक्के आणि एका वर्षात 54 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या 3 वर्षांत बँक ऑफ बडोदाने आपल्या गुंतवणूकदारांना 64 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

कायम्हणतायततज्ज्ञ?
एकूण 32 पैकी 27 तज्ञांनी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. यापैकी 15 विश्लेषकांनी स्ट्राँग बाय आणि 12 ने बाय ची शिफारस केली आहे. ज्यांच्याकडे बँक ऑफ बडोदामध्ये आधीपासून शेअर्स आहेत त्यांच्यासाठी 4 तज्ञांनी होल्डची शिफारस केली आहे आणि एकाने त्वरित विकण्याचा सल्ला दिला आहे.

एनपीए झाला कमी
बँक ऑफ बडोदाचा शेअर NSE वर 9.55 टक्क्यांनी वाढून 158.35 रुपयांवर बंद झाला. सप्टेंबर तिमाहीच्या निकालांमध्ये बँक ऑफ बडोदाने त्यांच्या निव्वळ नफ्यात 59 टक्के वाढ जाहीर केली आहे. या कालावधीत कंपनीचा नफा 3,313 कोटी रुपये झाला आहे. बँक एनआयआय देखील 34.5 टक्क्यांनी वाढून 10,714 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर बँकेची एकूण नॉन-परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) 5.31 टक्के आहे. गेल्या वर्षी एनपीए 8.11 टक्के होता.
(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांना किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Buy Sell or Hold Bank Of Baroda shares hit rocket speed experts say it is wise to buy bse nse multibagger share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.