Lokmat Money >शेअर बाजार > फार्मा-FMCG स्टॉक्समध्ये खरेदी; खालच्या पातळीहून रिकव्हरी; Sensex २०२ आणि निफ्टीत ८१ अंकांची घसरण

फार्मा-FMCG स्टॉक्समध्ये खरेदी; खालच्या पातळीहून रिकव्हरी; Sensex २०२ आणि निफ्टीत ८१ अंकांची घसरण

Stock Market Closing On 4 September 2024: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. अमेरिका आणि आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारात नफावसुली दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:57 PM2024-09-04T15:57:30+5:302024-09-04T15:57:59+5:30

Stock Market Closing On 4 September 2024: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. अमेरिका आणि आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारात नफावसुली दिसून आली.

Buying in Pharma FMCG stocks recovery from low levels Sensex 202 and Nifty down 81 points | फार्मा-FMCG स्टॉक्समध्ये खरेदी; खालच्या पातळीहून रिकव्हरी; Sensex २०२ आणि निफ्टीत ८१ अंकांची घसरण

फार्मा-FMCG स्टॉक्समध्ये खरेदी; खालच्या पातळीहून रिकव्हरी; Sensex २०२ आणि निफ्टीत ८१ अंकांची घसरण

Stock Market Closing On 4 September 2024: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. अमेरिका आणि आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारात नफावसुली दिसून आली. मात्र, बाजारानं खालच्या पातळीवरून मोठी रिकव्हरी केली आहे. 

सकाळी सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला होता, तर निफ्टी जवळपास २०० अंकांनी घसरला होता. परंतु फार्मा आणि एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे बाजार सावरण्यात यशस्वी झाला. आजच्या व्यवहाराअखेर बीएसई सेन्सेक्स २०३ अंकांनी घसरून ८२,३५२ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८१ अंकांनी घसरून २५,१९८ अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सचे ३० पैकी ११ शेअर्स वधारले आणि १९ घसरले. निफ्टीचे ५० शेअर्सपैकी १९ शेअर्स वधारले तर ३१ शेअर्स घसरले. बीएसईवर एकूण ४०४७ शेअर्सचे व्यवहार झाले, ज्यात १९२५ शेअर्स वधारले आणि २०२८ शेअर्स घसरले. ९४ शेअर्सच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
एशियन पेंट्स २.३९ टक्के, एचयूएल १.७४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.३१ टक्के, सन फार्मा १.१८ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.४३ टक्के, रिलायन्स ०.३४ टक्के, एचडीएफसी बँक ०.२५ टक्के, भारती एअरटेल ०.१८ टक्क्यांनी वधारले. तर दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा १ टक्के, अॅक्सिस बँक १.२० टक्के, एसबीआय १.०६ टक्के, आयसीआयसीआय बँक १.११ टक्के, इन्फोसिस ०.९५ टक्के, टाटा स्टील ०.७२ टक्क्यांनी घसरुन बंद झाले.

Web Title: Buying in Pharma FMCG stocks recovery from low levels Sensex 202 and Nifty down 81 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.