सिव्हिल कंस्ट्रक्शन बिझनेसशी संबंधित कंपनी कॅपेसाइट इंफ्राप्रोजेक्ट्सचा शेअर बुधवारी 11 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह 155.30 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर व्हॉल्यूममध्ये बुधवारी 6 पटींहून अदिकची तेजी दिसून आली आहे. गेल्या 3 दिवसांत कॅपेसाइट इंफ्राप्रोजेक्ट्स (Capacite Infraprojects) चा शेअर 21 टक्यांनी वधारला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही उसळी एक मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर आली आहे. कॅपेसाइट इंफ्राप्रोजेक्ट्सला रेमंडच्या रियल्टी डिव्हिजनकडून 224 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर ठाण्यातील टेनएक्स एरा (TenX Era) या निवासी प्रकल्पासाठी आहे.
कंपनीला गोदरेजकडूनही मिळतेय 478 कोटींची ऑर्डर -
आपल्याला विश्वास आहे की, आपण ठरलेल्या वेळेत प्रोजेक्ट डिलिव्हर करू, आसे कॅपॅसाइट इंफ्राप्रोजेक्ट्सच्या मॅनेजमेंटने म्हटले आहे. या कंपनीला गेल्या महिन्यात गोदरेज रेसिडेन्सी प्रायव्हेट लिमिटेड (गोदरेज ग्रुप) कडून 478.08 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर मुंबईतील महालक्ष्मीमधील रेसिडेंशियल टॉवर्सच्या कंस्ट्रक्शनसाठी आहे. ही कंपनी हाउसिंग, हाय राईज, सुपर हाय राईज, स्पेशियलिटी बिल्डिंग्स आणि अर्बन इंफ्रास्ट्रक्चरसाठी इंजिनिअरिंग, प्रेक्योरमेंट आणि कंस्ट्रक्शन सॉल्यूशन्स उपलब्ध करून देते.
एकाच वर्षात 37% वाढला शेअर -
कॅपॅसाइट इंफ्राप्रोजेक्ट्सचा शेअर गेल्या एका वर्षात 37 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा शेअर गेल्या वर्षात 11 मे रोजी 108.05 रुपयांवर होता. कॅपॅसाइट इंफ्राप्रोजेक्ट्सचा शेअर 10 मे 2023 रोजी बीएसईवर 147.95 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 192.35 रुपये होता. तर, निचांक 98.35 रुपये होता. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 1004 कोटी रुपये आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)