Join us

IPO Investment : कार डिलरशीपवाली कंपनी आणणार IPO, गुंतवणूकदारांना कमाईची मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 3:42 PM

या आयपीओमध्ये १३० कोटी रुपयांच्या फ्रेश इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज (IPOs) द्वारे पैसे कमवू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डिसेंबर हा चांगला महिना आहे. या महिन्यात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. त्याचबरोबर काही कंपन्यांचे आयपीओ रांगेतही आहेत. . अशीच एक कंपनी आहे - लँडमार्क कार्स. या कंपनीचा IPO 13 डिसेंबरला सुरू होणार आहे, तर 15 डिसेंबरपर्यंत तो खुला आहे. जाणून घेऊया या आयपीबाबत संपूर्ण माहिती.

Landmark cars च्या आयपीओचा प्राईस बँड 481-506 रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आलाय. या आयपीओमध्ये एकूण 150 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स सामील आहेत. याशिवाय प्रमोटर्सचे 402 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्स ओपन फॉर सेलद्वारे येणार आहेत.

Landmark cars नव्या कार्सची रिटेल विक्री, सर्व्हिसिंग आणि देखरेख, स्पेअर पार्ट्स आणि अन्य उत्पादनांची विक्री करते. याशिलाय जुन्या वाहनांची विक्री, थर्ड पार्टीच्या आर्थिक आणि विमा उत्पादनांचं वितरणही केलं जातं. 1998 मध्ये कंपनीनं आपलं कामकाज सुरू केलं आणि होडाच्या माध्यमातून पहिल्या डीलरशीपची सुरूवात केली.

आपल्या नेटवर्कचा विस्तार30 सप्टेंबर 2021 पर्यंत देशातील आठ राज्यांमध्ये लँडमार्कची 112 आऊटलेट्सच्या नेटवर्कचा विस्तार केला. यामध्ये 61 सेल्स आऊटलेट्स आणि 51 सर्व्हिस, तसंच स्पेअर आऊटलेट्स आहेत. लँडमार्क कार्स देशातील प्रमुख प्रीमिअम ऑटोमोटिव्ह रिटेल बिझनेस करणारी कंपनी आहे. त्यांच्याकडे सध्या मर्सिडीज बेंझ, होंडा, जीप, फोक्सवॅगन आणि रेनोसारख्या ब्रँडचं डिलरशीप आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक