Lokmat Money >शेअर बाजार > सातत्यानं क्रॅश होतोय 'हा' शेअर, एक्सपर्ट्सनं दिलं सेल रेटिंग; म्हणाले, "आणखी घसरणार भाव"

सातत्यानं क्रॅश होतोय 'हा' शेअर, एक्सपर्ट्सनं दिलं सेल रेटिंग; म्हणाले, "आणखी घसरणार भाव"

CDSL Share Price: शेअर मंगळवारी, २८ जानेवारी रोजी ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि १२४२.५० रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे त्यांची दोन दिवसांची घसरण वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:07 IST2025-01-28T16:06:41+5:302025-01-28T16:07:45+5:30

CDSL Share Price: शेअर मंगळवारी, २८ जानेवारी रोजी ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि १२४२.५० रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे त्यांची दोन दिवसांची घसरण वाढली

CDSL stock is continuously crashing experts give it a sell rating said Price will fall further | सातत्यानं क्रॅश होतोय 'हा' शेअर, एक्सपर्ट्सनं दिलं सेल रेटिंग; म्हणाले, "आणखी घसरणार भाव"

सातत्यानं क्रॅश होतोय 'हा' शेअर, एक्सपर्ट्सनं दिलं सेल रेटिंग; म्हणाले, "आणखी घसरणार भाव"

CDSL Share Price : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडचा (CDSL) शेअर मंगळवारी, २८ जानेवारी रोजी ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि १२४२.५० रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे त्यांची दोन दिवसांची घसरण वाढली. गेल्या आठवड्यात कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही घसरण झाली आहे. खरं तर, कमी व्यवहार शुल्क, ऑनलाइन डेटा शुल्क आणि इतर उत्पन्नामुळे सीडीएसएलच्या महसुलात १४% घट झाली. कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर ५.९९ टक्क्यांच्या घसरणीसह १२६३.५० रुपयांवर आला.

कर्मचाऱ्यांचा उच्च खर्च आणि कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा खर्च इतर खर्चातील घट अंशत: भरून काढतो. तिमाही आधारावर मार्जिन ४२४ बेसिस पॉईंटनं घसरून ५७.८ टक्क्यांवर आलं आहे. इतर उत्पन्न जवळपास निम्म्यावर आलं असून, तिमाही आधारे निव्वळ नफ्यात २० टक्के घट झाली आहे. तिमाहीत उघडलेली निव्वळ खाती मागील तिमाहीतील १.१८ कोटी रुपयांवरून ९२ लाख रुपयांवर आली आहेत, तर व्यवहार शुल्काचं उत्पन्न सप्टेंबरमधील ८३ कोटी रुपयांवरून ५९ कोटी रुपयांवर आलंय.

काय म्हटलं ब्रोकरेजनं?

ब्रोकरेज फर्म बी अँड के सिक्युरिटीजनं सीडीएसएलचं रेटिंग आधीच्या रेटिंग 'होल्ड'वरून 'सेल' केलं आहे आणि शेअरवरील टार्गेट प्राइस पूर्वीच्या १,३०० रुपयांवरून १,१०० रुपये केलं आहे. सीडीएसएलचा समावेश असलेल्या १० विश्लेषकांपैकी दोन विश्लेषकांचे शेअरवर 'बाय' रेटिंग दिलं आहे, पाच जणांनी 'होल्ड' आणि उर्वरित तिघांचे शेअरवर 'सेल' रेटिंग दिलंय. हा शेअर १,९८९ रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या तुलनेत ३६% पेक्षा जास्त घसरला आहे.

(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: CDSL stock is continuously crashing experts give it a sell rating said Price will fall further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.