Cellecor Gadgets Stock Split News: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी सेलेकोर गॅजेट्स (Cellecor Gadgets) आहे. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आला होता. एसएमई आयपीओसाठी प्राइस बँड ८७ ते ९२ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. यानंतर कंपनीचं लिस्टिंग ९२ रुपयांवर झालं होतं. पण लिस्टिंग नंतर सेलेकोर गॅजेट्सच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ज्यामुळे शेअरचा भाव २९५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. म्हणजेच या ९ महिन्यांत या मल्टीबॅगर शेअरची किंमत २२० टक्क्यांनी वाढली आहे. पुन्हा एकदा ही कंपनी चर्चेत आली आहे. दरम्यान, कंपनीचे शेअर्स १० भागांमध्ये विभागले जातील, असं कंपनीनं म्हटलंय. या शेअर स्प्लिटसाठी कंपनीने रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे.
Cellecor Gadgets स्प्लिट डेट
२६ जून रोजी संचालक मंडळाची बैठक झाल्याची माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली आहे. या बैठकीत शेअर्सचं १० भागात विभाजन करण्यास मान्यता देण्यात आली. या शेअर विभाजनानंतर सेलेकोर गॅझेट्सच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर १० रुपयांवरून १ रुपयांपर्यंत खाली येईल. कंपनीनं ९ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
आज शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे
एनएसई एसएमईवर कंपनीचा शेअर ३१३.५० रुपयांवर उघडला. काही वेळाने तो ३१४ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. मात्र, हा शेअर पुन्हा ५ टक्क्यांनी घसरून २९१ रुपयांवर आला. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३५५ रुपये आहे. आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८८.१५ रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचं मार्केट कॅप ६१०.१६ कोटी रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)