Join us  

अवघ्या 12 दिवसांत तब्बल 1200 कोटींची कमाई, आता प्रचंड तोटा; नायडू कुटुंबाची संपत्ती घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 4:23 PM

गेल्या पाच दिवसांमध्ये हेरिटेज फूड्सचे शेअर्स 20 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

Chandrababu Naidu Family Wealth : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंचा (Chandrababu Naidu) पक्ष टीडीपी (TDP) ला बहुमत मिळाल्यानंतर नायडूंशी संबंधित हेरिटेज फूड्स (Heritage Foods ) या कंपनीच्या शेअर्सने वेग पकडला. त्यामुळे नायडू कुटुंबीयांच्या संपत्तीतदेखील विक्रमी वाढ झाली. मात्र, आता हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. 

गेल्या पाच दिवसांमध्ये हेरिटेज फूड्सचे शेअर्स 20 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरुन 578 रुपयांवर बंद झाले. पण, जेव्हा हा स्टॉक चर्चेत होता, तेव्हा अवघ्या 12 दिवसांत दुप्पट परतावा दिला. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 727.35 रुपये आहे, तर निम्न पातळी 208.20 रुपये प्रति शेअर आहे.

नायडू कुटुंबाकडे किती शेअर्स आहेत?Heritage Foods Ltd च्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरीकडे हेरिटेज फूड्सचे 2,26,11,525 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण स्टेकच्या 24.37 टक्के आहे. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेशकडे या कंपनीत 1,00,37,453 शेअर्स किंवा 10.82 टक्के हिस्सा आहे. याशिवाय त्यांची सून आणि इतर सदस्यांचीही या कंपनीत हिस्सेदारी आहे. यासह कुटुंबाकडे हेरिटेज फूडमध्ये एकूण 3,31,36,005 शेअर्स किंवा 35.71 टक्के हिस्सा आहे.

अवघ्या 12 दिवसांत 1,200 कोटींची कमाई23 मे रोजी हेरिटेज फूड्सचे शेअर्स 354.5 रुपयांवर होते, जे 10 जूनपर्यंत 727.9 रुपयांवर पोहोचले. 10 जून 2024 पर्यंत भुवनेश्वरी नारा यांची संपत्ती 1631.6 कोटी रुपये होती, तर नारा लोकेशची संपत्ती 724.4 कोटी रुपये होती. म्हणजेच एकूण 12 दिवसांत नायडू कुटुंबाने सुमारे 1,200 कोटी रुपये कमावले.

पाच दिवसांत एवढे नुकसान गेल्या आठवडाभरात हेरिटेज फूड्सचे शेअर्स सुमारे 21 टक्के किंवा 150 रुपयांनी घसरले. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीचे अंदाजे 339 कोटींचे आणि मुलगा नारा लोकेशचे 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणजेच, नायडू कुटुंबाचे एकूण 497 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

(टीप- कोणत्याही शेअरमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी कृपया तुमच्या मार्केट एक्सपर्टचा सल्ला घ्या.)

टॅग्स :चंद्राबाबू नायडूशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक