Lokmat Money >शेअर बाजार > Chennai Petroleum Corporation Ltd: १ शेअरवर ५५ रुपयांचा डिविडेंड देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० जुलैपूर्वी; जाणून घ्या

Chennai Petroleum Corporation Ltd: १ शेअरवर ५५ रुपयांचा डिविडेंड देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० जुलैपूर्वी; जाणून घ्या

Chennai Petroleum Corporation Ltd: या कंपनीनं प्रति शेअर ५५ रुपये डिविडंड देण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं डिविडंडची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 10:06 AM2024-07-08T10:06:27+5:302024-07-08T10:06:40+5:30

Chennai Petroleum Corporation Ltd: या कंपनीनं प्रति शेअर ५५ रुपये डिविडंड देण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं डिविडंडची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

Chennai Petroleum Corporation Ltd Dividend of Rs 55 per share record date is before July 20 find out details | Chennai Petroleum Corporation Ltd: १ शेअरवर ५५ रुपयांचा डिविडेंड देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० जुलैपूर्वी; जाणून घ्या

Chennai Petroleum Corporation Ltd: १ शेअरवर ५५ रुपयांचा डिविडेंड देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० जुलैपूर्वी; जाणून घ्या

Chennai Petroleum Corporation Ltd: चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं (Chennai Petroleum Corporation Ltd) लाभांश जाहीर केला आहे. कंपनीनं प्रति शेअर ५५ रुपये डिविडंड देण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं डिविडंडची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. जाणून घेऊया या लाभांश देणाऱ्या कंपनीबद्दल सविस्तर माहिती.

२० जुलैपूर्वीची रेकॉर्ड डेट

कंपनीनं १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरवर ५५० टक्के लाभांश जाहीर केला आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ५५ रुपये नफा मिळणार आहे. कंपनीनं लाभांशाची रेकॉर्ड डेट १९ जुलै २०२४ निश्चित केली आहे. या दिवशी पात्र गुंतवणूकदारांचं नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहिल्यास त्यांना लाभांश मिळणार आहे.

यापूर्वी कंपनीनं ४ ऑगस्ट २०२३ रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. त्यानंतर कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना २७ रुपयांचा लाभांश दिला. यावेळी कंपनी गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक लाभांश देत आहे.

कंपनीची कामगिरी कशी आहे?

सोमवारी कंपनीचा शेअर ९५९ रुपयांच्या पातळीवर उघडला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांकी पातळी (सकाळी ९.१९ वाजेपर्यंत) ९६६.१६ रुपये होती. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ११९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या शेअरमध्ये ६ महिन्यांत ३४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ११२२.९० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३४७.३० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप १४,३५५.०६ कोटी रुपये आहे.

कंपनीत प्रवर्तकांचा ६७.२९ टक्के हिस्सा आहे. तर कंपनीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडची ५१.९० टक्के आणि जनतेकडे १६.१४ टक्के हिस्सा आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Chennai Petroleum Corporation Ltd Dividend of Rs 55 per share record date is before July 20 find out details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.