Join us  

चीनच्या शेअर बाजारातील फुगा अखेर फुटला! एवढं करुनही पदरी निराशा; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 2:51 PM

China Stocks Fall : शेजारी राष्ट्र चीनच्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा फुगा अखेर फुटला आहे. दोन दिवसांच्या तुफान वाढीनंतर गुंतवणूकदारांनी आज बाजाराकडे पाठ फिरवली.

China Stocks Fall : गेल्या आठवड्यात जगभरातील शेअर बाजारात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली. चिनी सरकारने अलीकडेच व्याजदर कपात आणि आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. यानंतर चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारात अचानक उसळी आली. याचा पहिला फटका भारताला बसला. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसा काढून चीनमध्ये ओतायला सुरुवात केली. अवघ्या २ दिवसात चीनच्या अर्थव्यवस्थेत सुमारे १४.२ हजार कोटी डॉलर जमा झाले. मात्र, हा फुगा आठवडाभरही टिकल्याचे दिसत नाही. आशियातील इतर बाजारपेठांमध्ये वाढ होऊनही बुधवारी चीनच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 

चीनने आर्थिक पॅकेज जाहिर करुनही बीजिंगमधील अधिकाऱ्यांकडून त्या योजनांचा तपशील गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. परिणामी हाँगकाँगचे शेअर्स तेजी आणि मंदीच्या दरम्यान घुटमळत राहिले. हँग सेंग निर्देशांक २.४ टक्क्यांनी घसरून २०,४१८ वर आला. नुकत्याच झालेल्या तेजीनंतर व्यापाऱ्यांनी शेअर्सची विक्री केल्याने मंगळवारी ९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली, असे वृत्त पीटीआयने दिले.

इंडेक्स कोसळलासरकारच्या पॅकेजमध्ये असलेली कमतरता निराशेचे कारण आहे. आर्थिक धोरणे सप्टेंबरच्या उत्तरार्धात वितरीत करण्यात आलेल्या वित्तीय बाझूकाप्रमाणे असतील असं गुंतवणूकदारांना वाटतं होतं. मात्र, मंगळवारच्या घोषणेमध्ये स्पष्टपणे कमतरता होती, असं मत आयजीचे येप जून रोंग यांनी व्यक्त केलं. शांघाय कंपोझिट ५.१ टक्क्यांनी घसरून ३,३११.०२ वर आला. तर मंगळवारी राष्ट्रीय सुट्टीनंतर बाजार उघडला तेव्हा त्यात ४.६ टक्के वाढ झाली होती. लोक अर्धवट आश्वासनांना भिक घालणार नसल्याचे चिनी शेअर बाजारातील घसरणीने स्पष्ट झाले.

जपानी बाजारपेठेत वाढटोकियोमध्ये, निक्केई २२५ निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वाढून ३९,१७८ वर पोहोचला. कॅनेडियन सुविधा स्टोअर ऑपरेटर एलिमेंटेशन काउच-टार्डने त्याच्या टेकओव्हर डिलमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ केल्याची बातमी आली. त्यानंतर जपानी किरकोळ विक्रेता सेव्हन अँड होल्डिंग्जच्या शेअर्सने सुरुवातीच्या व्यवहारात १० टक्क्यांहून अधिक उडी मारली. सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी जपानची संसद बुधवारी बरखास्त करण्यात येणार होती. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा एस एण्ड पी/एएसएक्स २००, ०.२ टक्क्यांनी वाढून ८,१८९ वर पोहोचला. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे दक्षिण कोरियातील बाजारपेठा बंद होत्या.

भारतीय शेअर बाजाराचा कमबॅकभारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण बैठकीचे निर्णय आज जाहीर करण्यात आले. यापूर्वी शेअर बाजारात मोठा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या ५ दिवसात सुरू असलेल्या पडझडीनंतर बाजाराने चांगलं कमबॅक केलं आहे. आज बँक निफ्टी सुमारे २०० अंकांनी उघडला आहे तर निफ्टी आयटीमध्येही २०० अंकांची वाढ दिसून येत आहे. आयटी शेअर्सव्यतिरिक्त, बँक निफ्टी तेजीत असून एसबीआय आजचा बिग गेनर आहे.

टॅग्स :चीनशेअर बाजारशेअर बाजार