Lokmat Money >शेअर बाजार > ED ची क्लीन चिट! Paytm च्या गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' परतले, शेअरला अपर सर्किट

ED ची क्लीन चिट! Paytm च्या गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' परतले, शेअरला अपर सर्किट

गेल्या काही दिवसांपासून पेटीएम पेमेंट्स बँकेची चर्चा सुरू आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यापासून त्यांच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:41 AM2024-02-19T10:41:07+5:302024-02-19T10:41:43+5:30

गेल्या काही दिवसांपासून पेटीएम पेमेंट्स बँकेची चर्चा सुरू आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यापासून त्यांच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे.

Clean chit from ED Paytm Investors Good Days Return Shares Upper Circuit brokerage share might go up 600 rs | ED ची क्लीन चिट! Paytm च्या गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' परतले, शेअरला अपर सर्किट

ED ची क्लीन चिट! Paytm च्या गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' परतले, शेअरला अपर सर्किट

गेल्या काही दिवसांपासून पेटीएम पेमेंट्स बँकेची चर्चा सुरू आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यापासून त्यांच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. याचाच परिणाम पेटीएमच्या शेअर्सवरही झाला होता. यानंतर पेटीएमच्या शेअर्सची किंमत 318 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरली होती. परंतु आता पुन्हा एकदा पेटीएमच्या गुंतवणूकदारांचे अच्छे दिन परतल्याचं दिसत आहे. कामकाजाच्या दोन दिवसांमध्ये पेटीएमच्या शेअर्सला अपर सर्किट लागलंय. दोन कारणांमुळे पेटीएमच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं जातंय. पहिलं कारण म्हणजे अॅक्सिस बँकेकडे नोडल खात्यांचं ट्रान्सफर करणं आणि दुसरं कारण म्हणजे ईडीचा एक रिपोर्ट असल्याचं म्हटलं जातंय.

 

ED ची क्लीन चिट!
द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार सक्तवसूली संचलनालयानं (Enforcement Directorate) आपल्या तपासामध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेनं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं आढळून आलं आहे.
 

600 पर्यंत जाऊ शकतो भाव
 

बर्नस्टीनच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या शेअर्सची किंमत 600 रुपयांपर्यंत जाऊ शकते. ब्रोकरेज हाऊसनं ॲक्सिस बँकेच्या निर्णयानंतर शेअरचं टार्गेट प्राईज वाढवलं आहे.

 

दररोज होत होती घसरण
 

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर, 1 फेब्रुवारी रोजी पेटीएमच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी घसरण झाली होती. त्या दिवशी कंपनीच्या शेअर्सची किंमत 761 रुपयांवरून घसरून 608.80 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार सुरूच होते. एक अशी वेळ होती जेव्हा पेटीएमच्या शेअर्सची किंमत 318.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती.
 

केंद्रीय मंत्र्यांनी काय म्हटलेलं?
 

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पेटीएम पेमेंट्स बँक लि. (PPBL) वर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियामकीय कारवाईनं फिनटेक कंपन्यांचं लक्ष कायद्याचं पालन करण्याच्या महत्त्वाकडे वेधलं आहे. चंद्रशेखर यांनी यावर जोर दिला की नियमांचं पालन कंपन्यांसाठी 'ऐच्छिक' असू शकत नाही, तर प्रत्येक उद्योजकाला याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजं.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

Web Title: Clean chit from ED Paytm Investors Good Days Return Shares Upper Circuit brokerage share might go up 600 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.