तीन दिवसांपासून देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेली घसरण अखेर बुधवारी थांबली. सेन्सेक्स, निफ्टी आज उसळीसह बंद झाले. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 351.49 अंकांच्या किंवा 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 66,707.20 अंकांवर बंद झाला.
त्याचप्रमाणे NSE निफ्टी 97.70 अंकांच्या म्हणजेच 0.5 टक्क्यांच्या वाढीसह 19,778.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचा शेअर सर्वाधिक 15 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला. लार्सन अँड टुब्रोचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक 3.56 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल सांगायचं झालं तर कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित निर्देशांकात 1-1 टक्क्यांची वाढ झाली. त्याचप्रमाणे बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये वाढ
बीएसई सेन्सेक्सवरील लार्सन अँड टुब्रोचा शेअर 3.30 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला. त्याचप्रमाणे आयटीसीचा शेअर 2.11 टक्क्यांनी, सन फार्मा 1.70 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.65 टक्के, कोटक महिंद्रा बँकेचे शेअर 1.12 टक्क्यांनी, अॅक्सिस बँकेचे शेअर 1.10 टक्क्यांनी आणि इन्फोसिसचे समभाग 1.07 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
यात घसरण
बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये 2.29 घसरण झाली तोटा झाला. त्याचप्रमाणे बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि आयटीसी यांचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले.
रुपयातही घसरण
आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी घसरून 82 वर बंद झाला. मागील सत्रात तो 81.87 च्या पातळीवर बंद झाला होता.