Share Market Closing Bell : मंगळवारी दिवसभर शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. गॅप डाऊन ओपनिंगनंतर आज निफ्टी आणि सेन्सेक्सने चांगली रिकव्हरी दाखवली असली तरी कमकुवत बाईंग सेंटिमेंट्समुळे बाजार लाल रंगात बंद झाला. आज सेन्सेक्स 362 अंकांनी घसरून 72470 च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 92 अंकांनी घसरून 22004 च्या पातळीवर बंद झाला.
मंगळवारच्या बाजारात निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या सपोर्ट झोनमध्ये बंद झाले आहेत. मंगळवारी गॅप डाउन ओपनिंगनंतर, दिवसभर विक्रीचा दबाव होता. परंतु असं असतानाही निफ्टीनं 22000 च्या पातळीवर राहण्यात यश मिळवलं. त्याचप्रमाणे सेन्सेक्स देखील 72400 च्या वर बंद झाला.
कामकाजादरम्यान हिंदाल्को (2.34 टक्के वाढ), बजाज फायनान्स (2.42 टक्क्यांनी), अदानी पोर्ट (1.90 टक्क्यांनी), ब्रिटानिया (1.70 टक्क्यांनी) यांचे शेअर्स वधारले. सकाळच्या सत्रात एचडीएफसी लाइफ आणि अदानी पोर्टमध्ये चांगली तेजी दिसून आली होती आणि ते ग्रीनझोनमध्ये बंद झाले.
तर दुसरीकडे पॉवर ग्रिड, भारती एअरटेल,आयशर मोटर्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक फ्लॅट ते निगेटिव्ह राहिले. सर्व निफ्टी निर्देशांक रेड झोनमध्ये बंद झाले. केवळ निफ्टी ऑटो निर्देशांकात थोडी वाढ दिसून आली.