Join us  

Closing Bell: सेन्सेक्स ७४००० च्या खाली, टाटा कन्झुमरमध्ये तेजी; आयटी शेअर्स आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 4:03 PM

मंगळवारी दिवसभर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 110 अंकांनी घसरला आणि 73903 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Closing Bell Today:  मंगळवारी दिवसभर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 110 अंकांनी घसरला आणि 73903 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 9 अंकांच्या किंचित घसरणीसह 22,453.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजार निर्देशांकांबद्दल बोलायचे तर निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी ग्रीन झोनमध्ये बंद झाले. तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण दिसून आली. 

मंगळवारी शेअर बाजारात टाटा कंझ्युमर, महिंद्रा, बजाज ऑटो, बीपीसीएल, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर हीरो मोटोकॉर्प, कोटक बँक, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाईफ, इन्फोसिस आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली. 

शेअर बाजाराच्या कामकाजात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हिंदुस्तान झिंक, ओएनजीसी, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर ॲक्सिस बँक, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेकमध्ये घसरण झाली. 

दिवसाच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 74000 च्या पातळीवर पोहोचला होता, परंतु व्यवहाराच्या शेवटी तो 74000 चा स्तर तोडून खाली आला. निफ्टी 22450 च्या खाली बंद झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनी उत्तम कामगिरी केली आहे. 

टॅग्स :शेअर बाजार